Search This Blog

Friday, 3 October 2025

एकरक्कमी व्याज परतावा योजनेस 2026 पर्यंत मुदतवाढ


एकरक्कमी व्याज परतावा योजनेस 2026 पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि.03 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थीकडूनथकीत कर्ज वसुलीसाठी यापूर्वी लागू केलेल्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कम व्याजासह एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस 50 टक्के सवलतीची योजनेच्या प्रथम टप्प्यास दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. 50 टक्के व्याज सवलतीच्या सदर योजनेस आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुसारसर्व योजनांतर्गत कर्ज खाते बंद करू इच्छिणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतीलमहामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीना सदर योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावेयोजनेचा लाभ घेणाऱ्या  लाभार्थीची माहिती विहीत नमुन्यात मुख्यालयास दरमहा सादर करावीअसे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment