Search This Blog

Friday, 31 October 2025

निर्लेखित शासकीय वाहनाच्या विक्रीकरीता 10 नोव्हेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

 


निर्लेखित शासकीय वाहनाच्या विक्रीकरीता 10 नोव्हेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

चंद्रपूरदि. 31 :  निर्लेखित  शासकीय वाहनाची विक्री ज्या स्थितीत व जेथे आहे त्या स्थितीत करण्यासाठी इच्छुक खरेदीदारांकडून 10 नोव्हेंबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहे.

विक्री करण्यात येणारे वाहन क्रमांक MH३४-९९००इन्होवा डीव्ही वाहनाची उपप्रादेशिक परिहवन अधिकारी यांनी ठरवून दिलेली बाजारमुल्य किंमत लक्ष 50 हजार रुपये असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात सदर वाहन उभे आहेनिविदा अर्जाची किंमत एक हजार रुपये असून सदर अर्ज सहायक जिल्हा नाझरजिल्हा कार्यालयचंद्रपूर यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 10 नोव्हेंबरच्या दुपारी 2  वाजेपर्यंत प्राप्त करता येईललिलावातील अटी व शर्ती बाबत उल्लेख निविदा फॉर्ममध्ये राहीलत्याचे अधिन राहून निविदा स्विकारल्या  जातीलप्राप्त  निविदा 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4  वाजता उपस्थितांसमोर उघडण्यात येतील.

              वरील शासकीय वाहनांच्या बाबतीत पुरेशा निविदा प्राप्त न झाल्यास शासकीय वाहनाच्या  विक्रीबाबत खुली बोली बोलून लिलाव त्याच दिवशी करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी डी.एसकुंभार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment