Search This Blog

Friday, 3 October 2025

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय व्याज परताव्यासोबतच आत्ता उद्योजकता प्रशिक्षण

 अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय व्याज परताव्यासोबतच आत्ता उद्योजकता प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 01 : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहेमहामंडळ आता केवळ बँक कर्जावरील ब्याज परतावा योजनाच नाहीतर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व देखील देणार आहेहा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत न देतात्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हातेज्यामध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतलाया वेबिनारमध्ये ‘पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय’ या  विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉसोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केलेदुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर तसेच उत्तम जातीच्या जनावरांची निवडदुग्धव्यवसायासाठी अधिक दूध देणाऱ्या जातीच्या गाई-म्हशींची निवड कशी करावीयाचे मार्गदर्शन डॉमाने यांनी केले.

जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य आहार कसा असावासंतुलित आहारहिरवा आणि सुका चारातसेच आवश्यक खनिज मिश्रणेआरोग्याची काळजीजनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल त्यांनी सखोल माहिती दिलीवेळोवेळी लसीकरण करणे,स्वच्छतेचे नियम पाळणे आणि आजार झाल्यास त्वरित उपचार करणे यावर मार्गदर्शन केलेया वेबिनारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदतीशिवायव्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय ज्ञानही मिळाले.

राज्यभरातून अनेक युवकमहिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते.  महामंडळाकडून पुढील दिवसांत विविध जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेअसे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment