Search This Blog

Monday, 1 December 2025

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने 1 लक्ष दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण


मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लक्ष दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

Ø दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

चंद्रपूर मुंबई, दि. 01 : राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून  देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेतसमाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व रतननिधी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेतया उपक्रमाद्वारे लक्ष दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असूनहा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणाले,  दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असूनस्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणेत्यांचा आत्मविश्वास वाढवणेत्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात  सहभागी करणे, हा आहेकृत्रिम हातपायश्रवणयंत्रेव्हीलचेअर्स आणि इतर सहाय्यक उपकरणे यांचा समावेश असलेला हा  वितरण कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहेरतननिधी फाऊंडेशनने राज्यातील बीडचंद्रपूरजळगावसोलापूरपालघरमुंबईगडचिरोलीपुणेसाताराकोल्हापूररायगडलातूरनांदेडयवतमाळअकोला, परभणीछत्रपती संभाजीनगरधाराशिव आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये 29496 सहाय्यक साधनांचे (जयपूर फूटपोलिओ कॅलिपर्सकृत्रिम हात व काठीवितरण करून सुमारे 26 हजार दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन केले आहे.

जागतिक स्तरावर सुमारे 15 टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. तर भारतात हा आकडा सुमारे 2.2 टक्के आहेया पार्श्वभूमीवर रतननिधी फाऊंडेशनचा मोबिलिटी प्रकल्प दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्याची उर्मी देणाराआत्मविश्वास मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

००००००

3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा


डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा

चंद्रपूरदि. 01 : प्रत्येक वर्षी डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतोया वर्षाची थीम सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग – सर्वसामावेशक समाज घडविणे’ अशी आहे.  3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हयातील शासकिय यंत्रणास्वयंसेवी संस्थासामाजिक संघटनाचा सहभाग घेऊन  दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळाकर्मशाळा मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथे  सकाळी वाजता  येथे आयोजित करण्यात आल्या आहेततसेच सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहेयाशिवाय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विभागाचा परिचयशासकिय योजनाविभागाचे धोरणकायदेनियम/  दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शनशिबीरे आयोजित करण्यात येणार आहेक्रीडा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांगांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावेअसे आहवन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

००००००

बीआरटीसी व नागपूर विद्यापीठात शैक्षणिक व संशोधन सहकार्यासाठी सामंजस्य करार

 


बीआरटीसी व नागपूर विद्यापीठात शैक्षणिक व संशोधन सहकार्यासाठी सामंजस्य करार

चंद्रपूरदि. 01 : बांबू क्षेत्रातील शैक्षणिक उन्नतीसंशोधनकौशल्यविकास आणि उद्योजकता वाढीसाठी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसीआणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार विद्यापीठाच्या कुलगुरू माधवी खोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या करारामुळे बांबू तंत्रज्ञानबांबू हस्तकलाबांबू फर्निचर डिझाईनबांबू बांधकाम,  वन आधारित वास्तुकला व शाश्वत बांधकाम पद्धती आणि निसर्ग निर्वाचन यांसारख्या विषयांवर संयुक्त कार्यशाळासेमिनारप्रशिक्षण शिबिरे आणि क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यास दोन्ही संस्था एकत्र काम करतीलयामुळे विद्यार्थीप्राध्यापक  विनिमय कार्यक्रमतज्ज्ञ व्याख्याने आणि संशोधन क्षमतावृद्धीसाठी तांत्रिक देवाणघेवाण यांनाही गती मिळणार आहेविद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांसाठी बीआरटीसीमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रिअल-टाइम प्रोजेक्ट्सफील्ड असाइनमेंट्स आणि पर्यावरणपूरक विकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांबू तंत्रज्ञानातील व्यावहारिक ज्ञान मिळणार आहेअभ्यासक्रम निर्मितीशैक्षणिक पाठबळप्रमाणन आणि बांबू तंत्रज्ञानावर केंद्रित संशोधन व डॉक्युमेंटेशनलाही विद्यापीठाकडून प्रोत्साहन दिले जाणार आहेराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी सुसंगत अशा कौशल्याधारित अल्पमुदतीच्या क्रेडिट अभ्यासक्रमांची अंमलबजावणी बीआरटीसीतर्फे करण्यात येणार असून हे अभ्यासक्रम विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये Choice-Based Credit System (CBCS) अंतर्गत उपलब्ध करून देण्याची तयारी आहेबांबू प्रक्रियाकरणहस्तकलातंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये युवककारागीर आणि स्थानिक उद्योजकांना दिशा देणारे उपक्रम राबवणे हेही कराराचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

यावेळी विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉमाधवी खोडे (चवरे), कुलसचिव डॉराजू हिवसेबीआरटीसीचे संचालक मनोज कुमार खैरनारविज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉउमेश पलीकुंडवारआंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉराजश्री वैष्णवआयआयएलचे संचालक डॉप्रकाश ईटणकरआजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉसमित माहोरेडॉनिशिकांत राऊतरोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉभूषण महाजनएलईडी महिला महाविद्यालयातील डॉसारिका दगडकरवनपरिक्षेत्र अधिकारी एडीमल्लेलवार तसेच हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड यांची उपस्थिती होती.

या कराराचा कालावधी पाच वर्षांचा असून हा करार बांबू आधारित शाश्वत उपजीविकारोजगारनिर्मितीग्रामीण विकास आणि हरित उद्योजकतेच्या दिशेने एक मोलाचे पाऊल मानला जात आहेविशेषतः  विदर्भासारख्या बांबू समृद्ध भागास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहेबीआरटीसीच्या तांत्रिक अनुभवास विद्यापीठाच्या शैक्षणिक सामर्थ्याची जोड मिळाल्याने महाराष्ट्रातील बांबू क्षेत्रासाठी एक मजबूतदीर्घकालीन आणि परिणामकारक सहकार्य मॉडेल उभे राहणार आहेया करारामुळे बीआरटीसी चिचपल्लीचे स्थान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील बांबू उत्कृष्टता केंद्र म्हणून अधिक भक्कम होईलअसा विश्वास यावेळी केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांनी व्यक्त केला.

०००००००

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नागपूरात भव्य कार्यक्रम


हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नागपूरात भव्य कार्यक्रम

Ø श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह टपाल तिकीट जारी होणार

चंद्रपूर / मुंबई दि.01 :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेतया अंतर्गत डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह  भारतीय डाक विभागामार्फत स्मृतिचिन्ह म्हणून टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय घेतला.  7 डिसेंबर रोजी नागपूर येथील सुरेशचंद्र सुरी ग्राउंडजरीपटका पोलिस स्टेशन रोडनारा येथे सकाळी ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेकार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय प्रदर्शनी समितीची बैठक मुंबईत नुकतीच झालीयावेळी नियोजनाबाबत चर्चा आणि प्रदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीस कोकण भवनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य रविंद्र पवार,  राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष तथा समितीचे निमंत्रक व कार्याध्यक्ष बल मलकित सिंह,  समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी डॉजगदिश साकवानसमितीचे सदस्य लढाराम नागवाणीडॉ.कुलतारसिंह चीमा , जयराम पवार , श्रीनिवास पुलैयारवींद्र राठोड , अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या अवर सचिव विशाखा आढाव यांच्यासह राज्यस्तरीय समन्वय समितीचे सदस्य यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहेतीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात  संतांचा इतिहासकार्यराष्ट्रसेवा यासंदर्भात माहिती देणारी प्रदर्शनेही उभारण्यात येतीलशीखसिकलीगरबंजारालबानामोहयालवाल्मिकी आणि सिंधी समाज एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम करणार आहेत.

संतांचे साहित्य आणि पुस्तकांचे विशेष प्रदर्शनही याप्रसंगी आयोजित करण्यात येणार आहेया शताब्दी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा धर्मरक्षणसहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००००

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण

 जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 01 : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयचंद्रपूर यांच्या वतीने आज नवीन अधिकृत लोगोचे लोकार्पण करण्यात आलेहा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांच्या हस्ते संपन्न झालायावेळी  कार्यालयातील तांत्रिक व आस्थापना  विभागांतील अधिकारी  व कर्मचारी  उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेतउत्तरदायित्वात आणि नागरिकाभिमुख सेवेत सातत्याने  होत असलेल्या सुधारणा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा नवीन लोगो विभागाच्या ओळखीला नवी  दिशा देणारा ठरेलअसे मत डॉअशोक कटारेयांनी व्यक्त केलेनवीन लोगोमुळे जिल्हा आरोग्य विभागाची  एक वेगळी ओळख निर्माण होउन यामुळे विभागाची कार्यसंस्कृतीदृष्टीकोन आणि जनतेशी असलेली बांधिलकी अधिक स्पष्टपणे दृश्यमान होईलया उपक्रमामुळे विभागाची प्रतिमा अधिक बळकट होईलअसा विश्वास विभागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉकिशोर भट्टाचार्य  यांनी  केले.

०००००००