3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा
चंद्रपूर, दि. 01 : प्रत्येक वर्षी 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या वर्षाची थीम ‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग – सर्वसामावेशक समाज घडविणे’ अशी आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हयातील शासकिय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनाचा सहभाग घेऊन दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा/ कर्मशाळा मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे सकाळी 8 वाजता येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याशिवाय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विभागाचा परिचय, शासकिय योजना, विभागाचे धोरण/ कायदे/ नियम/ दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांगांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आहवन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment