Search This Blog

Thursday, 18 December 2025

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन

 

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन

Ø अनेक नामवंत संशोधकांचा सहभाग

चंद्रपूरदि. 18 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसीचिचपल्ली या संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तसेच राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेसंशोधन परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीवएमएसरेड्डीअतिरिक्त विभागीय आयुक्त डॉमाधवी खोडेअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात एमएसरेड्डी यांनी बांबूला ग्रीन गोल्ड असे संबोधून हवामान बदलहरित विकासरोजगारनिर्मिती तसेच शाश्वत अर्थव्यवस्था उभारणीमध्ये बांबूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केलेबांबू आधारित उद्योगांच्या वाढीसाठी शासन विभागसंशोधन संस्था व उद्योग यांच्यातील समन्वय आणि सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉमाधवी खोडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र बांबू औद्योगिक धोरण 2025 चा संदर्भ देत बांबू हा उपजीविका निर्मितीग्रामीण विकास व हरित उद्योगांसाठी एक महत्त्वाचा स्रोत असल्याचे स्पष्ट केलेधोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बीआरटीसीने संशोधननवोन्मेषप्रोटोटायपिंगकौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावावीअसे त्यांनी सांगितलेयाच अनुषंगाने डॉखोडे यांनी नागपूर विद्यापीठ व बीआरटीसी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून शैक्षणिक सहकार्यसंयुक्त संशोधनइंटर्नशिप तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमुळे बांबू तंत्रज्ञान व उद्योजकतेला चालना मिळेलअसे प्रतिपादन केले.

तांत्रिक सत्रांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील संशोधक व तज्ज्ञांनी बांबू हस्तकलेतील मूल्यवर्धनआवश्यक तेलांपासून बांबू संरक्षकांची निर्मितीकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आधारित स्मार्ट बांबू लागवडबांबू कोळशावर आधारित ऊर्जा निर्मितीबांबू व इतर बांधकाम साहित्यांचे जीवनचक्र मूल्यांकनबांबू प्रजातींचे औषधी गुणधर्म तसेच पर्यावरणपूरक बांबू संरक्षण तंत्रे अशा विविध विषयांवर संशोधन सादरीकरणे केली.

या परिसंवादास लालसिंग (वरिष्ठ शास्त्रज्ञनीरीनागपूर), डॉप्रकाश इटनकर (नागपूर विद्यापीठ), डॉकेटीव्हीरेड्डी (डीनदत्ता मेघे वैद्यकीय संस्था), डॉएनगुप्ता (जेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटनागपूर), दिनेश लाकडे (स्ट्रक्चरल तज्ज्ञवर्धा), प्राप्रमोद महाले (डीएमआयएचईआर विद्यापीठ), एमगिरी वर्धा चे दीप वर्माडॉप्रशांत तायडेडॉसंदीप जोशीडॉविजय इलोरकरआर्किटेक्ट आशिष नागपूरकर (व्हीएनआयटीनागपूर), निधी गांधी (फॅशन डिझायनर), डॉमोनिकुंतला दास (आयआयटीगुवाहाटीतसेच डॉतारिका दगडकर (एसएमएमसीएनागपूरयांच्यासह अनेक मान्यवर तज्ज्ञ व संशोधक उपस्थित होते. 

बीआरटीसीचे संचालक मनोजकुमार खैरनार यांनी प्रास्ताविकातूनबीआरटीसी केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या संशोधन उपक्रमांचीप्रशिक्षण कार्यक्रमांचीऔद्योगिक सहकार्याची तसेच बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या दृष्टिकोनाची सविस्तर माहिती सादर केलीसंचालन स्नेहा मांडकेर यांनी केले तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी एडीमल्लेलवार यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment