Search This Blog

Friday, 19 December 2025

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिका-यांकडून यंत्रणेचा आढावा


 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिका-यांकडून यंत्रणेचा आढावा

चंद्रपूरदि. 19 : चंद्रपूर शहर महानगर पालिकेची निवडणूक जाहीर होताच महानगर पालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहेया पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी गुरुवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमनपा आयुक्त अकुनूरी नरेशउपायुक्त संदीप चिद्रवारपोलिस उपअधिक्षक प्रमोद चौगुलेमहावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडेवस्तु व  सेवा कर विभागाचे उपायुक्त संतोष हेमणेराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिकवाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटीलपोलिस निरीक्षक आसिफरजा शेखपरिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेआदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहेनिवडणुकीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय गांभियाने आणि जबाबदारीने काम करावेकोणतीही चूक होऊ देऊ नयेनिवडणूक संदर्भात कोणतीही तक्रार येणार नाहीयाची दक्षता घ्यावीनिवडणुकीच्या कामासाठी वेगवेगळे पथक तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावीमहानगर पालिकेने निवडणूक नियंत्रण कक्षविविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना त्वरीत सुरू करावीअशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सादरीकरणातून स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीचे कार्येनिगराणी पथकेभरारी पथकेतक्रार निवारण आदींविषयी माहिती दिली.

००००००

No comments:

Post a Comment