Search This Blog

Monday, 1 December 2025

एड्स विरोधी शपथ घेऊन दिला समानतेने जगण्याचा सल्ला



एड्स विरोधी शपथ घेऊन दिला समानतेने जगण्याचा सल्ला

Ø जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व बाईक रॅली

चंद्रपूरदि. 01 : डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेया अनुषंगाने विविध सामाजिक संस्थामहाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आलीया वर्षीचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करूएकजुटीने एचआयव्ही/एड्स ला लढा देऊनवं परिवर्तन घडवू !’ असे आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न झालायावेळी संदीप रामटेके यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केलेकार्यक्रमाला इनर्व्हिल क्लबच्या अर्चना उचकेरोटरी क्लबचे श्रीकांत रेशीमवालेमहेश उचकेराजेश गणियारपवारहिमानी गोयलशासकिय नर्सिंग कॉलेजच्या वृषाली नानोटेविद्या रघुगेसमाजकार्य विद्यालयाचे प्राध्यापक संतोष आडेप्रामनुरेएआरटीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉदिलीप मडावीअजय जैस्वालजिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवारजिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकरनसीमा शेखदेवेंद्र लांजेरोशन आकुलवारराज काचोळेमाधुरी डोंगरेसंगिता देवाळकर यांची उपस्थिती होती.

एडस् विरोधी शपथ घेऊन मान्यवरांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आलीसदर रॅली ही सामान्य रुग्णालयातून जटपुरा गेट मार्गेबसस्टॉप चौकजटपुरा गेटगिरनार ते गांधी चौक वरून वापस जिल्हा सामान्य रुग्णालयात समाप्त करण्यात आलीबाईक रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीजिल्ह्यातील नामांकित सामाजिक संस्था त्यामध्ये रोटरी क्लब पदाधिकारीआय.एम.पदाधिकारीएनर्व्हील क्लब पदाधिकारीशासकिय नर्सिंग कॉलेजप्रभादेवी नर्सिंग कॉलेजजिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे  समुपदेशकप्रयोगशाळा तंत्रज्ञएआरटी केंद्राचे सर्व कर्मचारीमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था द्वारा अनुदानित संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थालिंक वर्कर स्कीममायग्रंट प्रकल्पसंबोधन ट्रस्ट कोअर प्रकल्प,  नोबल शिक्षण संस्थामायग्रंट प्रकल्पट्रकर्स प्रकल्पविहान प्रकल्प , वन स्टॉप सेंटर इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

रॅलीच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप रामटेके यांनीरोटरी क्लबच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य सुरू असून या आजाराला देखील देशातून हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलेत्याचबरोबर एचआयव्ही बाधित रुग्णांना आरोग्याबाबतपोषक आहाराबाबत काय मदत करता येईलअसेही ते म्हणालेसमाजकार्य विद्यालयाचे प्रासंतोष आडे यांनी एचआयव्ही एड्स संदर्भात समाजकार्य विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिलीएआरटीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉदिलीप मडावी यांनी एआरटी केंद्रजिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले

जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी प्रास्तावित करतांनाप्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूचना देऊन गरोदर माता व सामान्य नागरिकांना एचआयव्ही तपासणी करण्याची सुविधासाहित्याची उपलब्धता आणखी प्रबळ करण्याचे आश्वासन दिलेत्याचबरोबर डापकू कर्मचारीआयसीटीसी केंद्रडीएसआरसी केंद्र व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रतालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील आयसीटीसी केंद्र कशाप्रकारे कार्यरत असून नागरिकांना मोफत तपासणीसमुपदेशनउपचार उपलब्ध करून देत आहेयाबद्दल माहिती दिली.

          कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी तर आभार जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर यांनी मानले.

०००००

No comments:

Post a Comment