Search This Blog

Thursday, 18 December 2025

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 163 लागू


महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 163 लागू

Ø जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश

चंद्रपूर,दि. 18 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करून आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू केली आहे.  निवडणूक प्रक्रिया शांतनिर्भयमुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये व सदर आचार संहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने उपायोजना करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागु असलेली आदर्श आचारसंहिता अंमलात असेपर्यंतचे कलम 163 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी खालील बाबींवर निर्बंध लागु केले आहेयात 1. शासकीय कार्यालये/विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यासघोषणा देणे/सभा घेणे इत्यादीवर निर्बंध, 2. शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध, 3. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी ताफ्यामध्ये पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मिटर परिसरात व दालनात व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध, 4. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणेआयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध, 5.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे 200 मीपरिसरात धरणे आंदोलनमोर्चानिदर्शनेउपोषणे करण्यावर निर्बंध, 6. धार्मिक स्थळेरुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचा प्रचार कार्यालयासाठी वापर करता येणार नाही तसेच सदर ठिकाणापासून जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध, 7. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जात/धर्म/भाषावार शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध, 

8. निवडणुकीचे प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलकझेंडे लावणे इत्यादी बार्बीवर निर्बंध. 9. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खाजगी व्यक्तींच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडेभित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय लावण्यास निर्बंध, 10. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार/रॅली/रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात 10 पेक्षा अधिक ( यामध्ये जास्तीत जास्त वाहने चारचाकी अथवा तीनचाकी व इतर वाहने दुचाकी असू शकतातमोटार गाडया/वाहने वापरण्यास निर्बंध, 11. मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर कुठल्याही माध्यमाव्दारे प्रत्यक्षरित्या अथवा सोशल मिडीयाव्दारे प्रचार करण्यास बंदी राहील. 12. कोणताही पक्ष अथवा उमेदवारवेगवेगळ्या जातीधर्मभाषा अथवा सामाजिक गट यांच्यामध्ये मतभेद होणारी किंवा ज्यामुळेत्यांच्यात परस्परांमध्ये द्वेश किंवा तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्यावर बंदी राहील. 13. जातधर्मजमात किंवा भाषा यांच्या आधारे आचारसंहिता कालावधीमध्ये अधिवेशन घेता येणार नाही, 14. निवडणूक प्रचार कालावधीमध्ये प्राण्यांचा तसेच 14 वर्षांखालील मुलांचा प्रचारासाठी वापर करण्यास बंदी राहील.

सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment