चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत 1,449 प्रकरणे
यशस्वीपणे निकाली
चंद्रपूर, दि. 14 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष एल. डी. बिले यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 10,549 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 17,666 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित प्रकरणांपैकी 1,223 तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 226 अशी एकूण 1,449 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.
लोक अदालतीदरम्यान मोटार अपघात वाहन नुकसान भरपाईची 38 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामध्ये एकूण 4 कोटी 33 लाख 76 हजार 384 रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. तसेच दाखलपूर्व प्रकरणांतून 72 लाख 41 हजार 238 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. धनादेश अनादर प्रकरणांपैकी 89 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून कामगार व औद्योगिक न्यायालयातील 6 प्रकरणेही यशस्वीपणे निकाली निघाली.
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. एस. एस. इंगळे यांनी सांगितले.
०००००००
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment