Search This Blog

Wednesday, 3 December 2025

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त राज्य समन्वय समितीकडून आढावा




 हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त राज्य समन्वय समितीकडून आढावा

Ø प्रचार पत्रिका आणि स्टीकरचे विमोचन

Ø नागपूर येथे श्री.गुरू तेग बहादुर साहिबजी यांचा 350 वा शहिदी समागम कार्यक्रम

चंद्रपूरदि. 3 : ‘हिंद-दी-चादर’ श्रीगुरू तेग बहादुर साहिब जी यांचा 350 वा शहिदी समागमाचा कार्यक्रम नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी होत आहेया अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त समाजबांधवांना याबाबत माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावीया उद्देशाने राज्य समन्वय समितीकडून मंगळवारी आढावा घेण्यात आला.

नियोजन सभागृह येथे झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारराज्य समन्व्य समितीचे सदस्य किसन राठोडपोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराजजितेंद्र महाराजसुदाम राठोडगुरुबिंदरसिंग अरोराचरणजित सिंग अरोराजसबीरसिंग सैनीप्रतापसिंग मुलचंदानीचंदरशेठ लालवाणीरणजितसिंग बिसनसिंग धोनीकुलजितसिंग अंधरेलेसदाशिव चव्हाणसंतोष राठोडसुदाम राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी किसन राठोड म्हणालेभारतातील सर्व समाज हे गुरू परंपरेशी जोडले आहेतसमाजाच्या कार्यक्रमात राज्य सरकारचा पुढाकार ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहेसरकारने एक पाऊल पुढे टाकले आहेत्यामुळे समाजाने दहा पाऊले पुढे यावेश्रीगुरू तेग बहादुर साहिब यांचे बलिदान लोकांपर्यंत पोहचावेया इतिहासातून नवीन समाज घडावाइतिहासाची पुर्नबांधणी व्हावीया उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रम होत आहेयात महाराष्ट्र विशेष असून आपल्या राज्यात तीन कार्यक्रम होणार आहेतयात पहिला कार्यक्रम नागपूर येथे 7 डिसेंबर रोजीदुसरा मुंबई येथे 31 डिसेंबर रोजी तर तिसरा कार्यक्रम नांदेड येथे 24 जानेवारी 2026 रोजी आयोजित आहे.

समाज जोडण्यासाठी राज्य सरकार समोर आले आहेया माध्यमातून शिखसिकलीगरबंजारालबानामोहयाल आणि सिंधी समाज एकत्र येत आहेहे आयोजन यशस्वी करण्यासाठी आज राज्य समन्वय समितीची बैठक चंद्रपूरात आयोजित करण्यात आली असून लोकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा उत्तम काम करीत आहेलोकांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्थाबैठकीची व्यवस्थाज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्थावेगवेगळ्या प्रवेशद्वारातून मुख्य मंडपामध्ये जाण्यासाठी व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात येत असल्याचे किसन राठोड यांनी सांगितले.

जसबीरसिंग सैनी म्हणालेया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र सरकारचे आभारश्रीगुरू तेग बहादुर यांनी मानवतेसाठी आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले आहेआपला इतिहास आपण योग्य प्रकारे समोर आणणे गरजेचे आहेजिल्हा प्रशासनाने नागपूर येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून द्यावीअशी मागणी त्यांनी केलीजितेंद्र महाराज म्हणालेगुरू तेग बहादुर साहिब यांचे बलिदान नेहमी आठवणीत रहावेयासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेजास्तीत जास्त नागरिकांनी नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहावेअसे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलेया कार्यक्रमाच्या जनजागृतीकरीता तयार करण्यात आलेल्या प्रचार पत्रिका आणि स्टीकरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

०००००००

No comments:

Post a Comment