Search This Blog

Tuesday, 23 December 2025

धान/भरडधान्य खरेदीकरीता शेतकरी नोंदणीला मुदतवाढ

 धान/भरडधान्य खरेदीकरीता शेतकरी नोंदणीला मुदतवाढ

चंद्रपूर,दि. 23 :  पणन हंगाम 2025-26 खरीप मधील शासकीय आधारभुत किमत खरेदी योजनेअंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करीता शेतकरी नोंदणीला या पुर्वी 15 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होतीपरंतु मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झालेली असूनकोणताही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये याकरीता खरीप पणन हंगाम 2025-26 मधील धान व भरडधान्य उत्पादक शेतकरी नोंदणी करीता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

तरी धानभरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जावून मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावीअसे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्हीएसतिवाडे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment