Search This Blog

Tuesday, 16 December 2025

विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप






विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप

Ø मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम

चंद्रपूरदि. 16 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकूल येथे सोमवारी पार पडला.   

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा उदघाटक म्हणून अपर आयुक्त आयुषी  सिंहतसेच विशेष अतिथी म्हणून सहआयुक्त दिगांबर चव्हाणश्रीसोनकवडेगडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजीत सिंगअमर राऊत उमेश काशीद (प्रकल्प अधिकारी देवरी), नितीन इसोकर (प्रकल्प अधिकारी नागपूर), आंबेडकर महादियालयाचे  प्राचार्य डॉदहेगावकरचंद्रपूर आणि चिमूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवाररोशनी चव्हाणडॉसायली चिखलीकर आादी उपस्थित होते.

या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागातील अधिकारीकर्मचारीप्रकल्प कार्यालयेशासकीय आश्रमशाळाचे मुख्याध्यापकशाळांचे प्रतिनिधी शिक्षकजवळपास 3500 विदयार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेसदर स्पर्धांमध्ये कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅन्डाबालॲथलेटिक्स (धावणेचालणेलांब उडीउंच उडीगोळाफेकथाळीफेक, ) आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होताविभागीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना व संघभावनेला चालना मिळालीतर विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीनाविन्यपूर्ण संकल्पना व सर्जनशीलतेचे दर्शन घडले.

यावेळी अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी  शासकीय आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केलेआदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांमध्ये  समन्वयसंघभावना व कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरताततसेच विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यामातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक  दृष्टीकोण जागृत होण्यास मदत होईलअसेही मत त्यांनी व्यक्त केलेतसेच उत्तमनियोजनबध्द सर्व स्पर्धांचे आयोजन केल्याबददल प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांचे विशेष कौतुक व सत्कार केला.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल सहभागी सर्व प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व चिमूर येथील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व समितीतील प्रमुखउपप्रमुखसर्व सदस्यसर्व मुख्याध्यापकक्रीडा समन्वयक तसेच संघ व्यवस्थापक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतोआपल्या सर्वांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळेसमन्वयामुळे व अथक परिश्रमामुळे सदर स्पर्धा अत्यंत शिस्तबद्धउत्साही व यशस्वीरीत्या संपन्न झाल्याखेळाडूंना प्रोत्साहन देणेस्पर्धांचे सुरळीत आयोजन करणे व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी आपण दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे.

समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केलेसंचालन सपना पिंपळकर आणि उमेश कडू यांनी तर आभार राजीव बोंगिरवार यांनी  मानले.

बक्षिस वितरण : विज्ञान प्रदर्शनी निकाल

प्राथमिक गटात प्रथम क्रमांक अर्चना कांदो (अनुआश्रम शाळा गुंडापल्लीहिच्या इंधन वाचवणारी चुल या प्रयोगालाद्वितीय क्रमांक सोनाक्षी व संध्या यांच्या लेजर लेंस मायक्रोस्कोपमाध्यमिक गटात प्रथम क्रमांक

स्वाती रामू घरातद्वितीय क्रमांक सुमित प्रमोद आलामच्या अन्न कचरा व्यवस्थापनउच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पल्लवी इष्टाम व वेदिका येरकाडे यांच्या ऑटोमॅटीक कार्बन डायऑक्साईड अणि युव्ही वाटर फिल्टर या प्रयोगालाद्वितीय क्रमांक निकीता प्रसादी काटेंगे यांना मिळाला.

सांस्कृतिक कार्यक्रम निकाल : प्रथम क्रमांक थीम डान्स बेला रुपेलाद्वितीय क्रमांक जंगोम लढाई डान्स

प्लेअर ऑफ टुर्नामेंट : 19 वर्षाखालील मुले – अनिल दुलस्सा वडे, 19 वर्षाखालील मुली – रोशनी राजु पुंगाटी भामरागड, 17 वर्षाखालील मुले – सुरज विजय दुर्वाभामरागड, 17 वर्षाखालील मुली – अल्का रामदास मरस्कोल्हेदेवरी, 14 वर्षाखालील मूले गणेश लालसु मटटामीभामरागड, 14 वर्षाखालील मूली -  दिक्षा वसंत सडमेकअहेरी.            या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट रेंजर सायकल भेट देण्यात आली.

अंतिम निकाल : सर्व वैयक्तिक ॲथलेटिक्स (धावणेचालणेलांब उडीउंच उडीगोळाफेकथाळीफेकव सांघिक कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅन्डाबाल सामने मिळूनसर्वसाधारण विजेता – प्रकल्प भामरागड – प्राप्त गुण 489, सर्वसाधारण उपविजेता – प्रकल्प देवरी – प्राप्त गुण 249, तृतीय विजेता – प्रकल्प गडचिरोली - प्राप्त गुण 223. विजयी  विदयार्थ्यांना शिल्डप्रशस्तीपत्रसायकल तथा सन्माचिन्ह देवून गौरवण्यिात आले.

०००००००

No comments:

Post a Comment