Search This Blog

Friday, 19 December 2025

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’




अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर

Ø शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे सावकारांना आवाहन

चंद्रपूरदि. 19 : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीतून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व सावकारांची आढावा बैठक घेतलीसावकारी कायदा व अधिनियम 2014 मध्ये दिलेल्या नियमांचे पालन करूनच सावकारी करणे बंधनकारक आहेअसेही त्यांनी स्पष्ट केलेनियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनअतिरिक्त्‍ पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडेजिल्हा उपनिबंधकसहकारी संस्था जयसिंह ठाकूर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेमहाराष्ट्रात सावकारी कायदा अधिनियम -2014 लागू आहेया कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सावकारांनी नियमांचे पालन करावेसर्व परवानाधारक सावकारांनी नोंदणी करणे आवश्यक आहेशासनाने व्याजाचा दर निश्चित केला आहेया दरापेक्षा जास्त दर आकारू नयेजास्त दर लावणे हा गुन्हा असून कायदेशीर कारवाईची तरतुद नियमात आहेतसेच कर्ज दिल्यानंतर वसुलीकरीता मारहाणअवैध मार्गाने दमदाटी व बळजबरी करता येणार नाहीव्यवसाय करतांना नियम आणि कायदे पाळणार नाहीत्यांच्यावर कडक कारवाई केली जाईलअसे जिल्हाधिकारी श्रीगौडा यांनी स्पष्ट केले.

पोलिस अधिक्षक श्रीसुदर्शन म्हणालेपरवानाधारक सावकारांनी नियमातच आपला व्यवसाय करावाअैवधरित्या सुरू असलेल्या सावकारीची माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला कळवावीमाहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

सादरीकरणात जिल्हा उपनिबंधक श्रीठाकूर यांनी उपस्थित सावकारांना कायद्याबाबत माहिती दिलीयावेळी ते म्हणालेसावकारी कायदा व अधिनियम 2014 च्या कलम 5 नुसार व्यवसायासाठी परवाना घेणे आवश्यक आहेसावकारी रेकॉडची तपासणी करण्याकरीता निबंधकाने मागणी केल्यास कलम 16 नुसार ती उपलब्ध करून देणे प्रत्येकाला बंधनकारक आहेतसेच अवैध सावकारीतून मालमत्ता खरेदी केली असल्यास कलम 18 नुसार ती रद्द करण्याचे अधिकार निबंधकांना आहेराज्य शासनाच्य 16 सप्टेंबर 2014 च्या कायद्यामध्ये व्याजाचे दर निश्चित करण्यात आले आहेयापेक्षा जास्त दर लावले तर कायदेशीर कारवाई होऊ शकतेअसेही त्यांनी सांगितले.

येथे करा तक्रार : जिल्हा हेल्पलाईन क्र. 18002338691 वर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरसहाय्यक निबंधकसहकार विभागउप निबंधकसहकार विभाग,  जवळचे पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करू शकतोआपली तक्रार गोपनीय ठेवण्यात येईल.

००००००

No comments:

Post a Comment