Search This Blog

Wednesday, 3 December 2025

आदिवासी समाजातील प्रतिनिधींनी 5 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

आदिवासी समाजातील प्रतिनिधींनी डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Ø कला व संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक

चंद्रपूरदि. 03 : 26 जानेवरी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी आदिवासी समाजातील प्रतिनिधी एक महिला व एक पुरुष यांना निमंत्रित करण्यात  आले आहे.

सदर कार्यक्रमासाठी चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुरबल्लारपुरराजुरागोडपिंपरी,  कोरपनाजिवतीमुलसावलीसिंदेवाहीपोंभुर्णा व चिमुर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चिमुरब्रम्हपुरीनागभिडवरोराभद्रावती  ह्या तालुक्यातील आदिवासी समाजातील 60 वर्षा पेक्षा कमी वयोगटातील कला आणि संस्कृतीचे पुरेसे ज्ञान असलेले इच्छुक पुरुष महिला उमेदवारांनी नावपत्ता आणि दुरध्वनी क्रमांकाचा उल्लेख असलेले अर्ज डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेअसे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

अर्जासोबत ओळखपत्रचारित्र्यप्रमाणपत्र (जिल्हा पोलीस अधिक्षकाचे यांचेकडून), वैद्यकिय प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून), जात प्रमाणपत्रआधार कार्डरहिवासी प्रमाणपत्र, (सरपंच सचिव), दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र,  पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.

००००००

No comments:

Post a Comment