हिंद- दी- चादर गुरु तेग बहादूर साहेब यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. ०४ : हिंद-दी- चादर श्री. गुरु तेग बहादुर साहेब जी यांचा ३५० वा शहिदी समागमाचा कार्यक्रम नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने लोकसहभातून नियोजन केले आहे. मात्र तरीसुद्धा नागपूर येथे ने -आण करण्यासाठी वाहन व्यवस्था व इतर व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गुरुद्वारा समितीच्या सर्व सदस्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा. याबाबत दानशूर व्यक्तींनी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment