Search This Blog

Monday, 1 December 2025

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने 1 लक्ष दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण


मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लक्ष दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

Ø दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

चंद्रपूर मुंबई, दि. 01 : राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून  देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेतसमाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व रतननिधी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेतया उपक्रमाद्वारे लक्ष दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असूनहा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणाले,  दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असूनस्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणेत्यांचा आत्मविश्वास वाढवणेत्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात  सहभागी करणे, हा आहेकृत्रिम हातपायश्रवणयंत्रेव्हीलचेअर्स आणि इतर सहाय्यक उपकरणे यांचा समावेश असलेला हा  वितरण कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहेरतननिधी फाऊंडेशनने राज्यातील बीडचंद्रपूरजळगावसोलापूरपालघरमुंबईगडचिरोलीपुणेसाताराकोल्हापूररायगडलातूरनांदेडयवतमाळअकोला, परभणीछत्रपती संभाजीनगरधाराशिव आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये 29496 सहाय्यक साधनांचे (जयपूर फूटपोलिओ कॅलिपर्सकृत्रिम हात व काठीवितरण करून सुमारे 26 हजार दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन केले आहे.

जागतिक स्तरावर सुमारे 15 टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. तर भारतात हा आकडा सुमारे 2.2 टक्के आहेया पार्श्वभूमीवर रतननिधी फाऊंडेशनचा मोबिलिटी प्रकल्प दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्याची उर्मी देणाराआत्मविश्वास मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

००००००

No comments:

Post a Comment