Search This Blog

Sunday, 10 February 2019

बचत गटांच्या मार्फत उद्योजकता विकासासाठी जिल्हा प्रशासनांनी पुढे येण्याचे सुरेश प्रभू यांचे आवाहन


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारीला तालुकास्तरीय आयोजन होणार

चंद्रपूरदि 9 फेब्रुवारी : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये अधिक उद्योजकता निर्माण करावी यासाठी हिरकणी योजनेची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारी पासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात करण्यात येईलअसे आश्वासन यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
          केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुंबई येथील मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकरअकोला येथून कौशल विकास राज्यमंत्री रणजीत पाटीलसंबंधित विभागाचे सचिव असीम गुप्तामहिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आदी सहभागी झाले होते.
       राज्य शासनामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरुवात आज करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या 10 बचत गटांची निवड केली जाणार आहे. या बचत गटांना आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहे.
       महाराष्ट्रातील चांगल्या बचत गटांना केंद्र पातळीवर काम करण्याची संधी देखील दिली जाईलअसेही आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.
     चंद्रपूर येथून संपर्क साधताना महापौर अंजली घोटेकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महिला बचत गटांसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
       बचत गट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावेअसे आवाहन देखील यावेळी घोटेकर यांनी केले
       आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
0000   

रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री  तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणा-या रमाई आवास घरकुल योजनेसाठी (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट आता 7 हजार इतके झाले आहे. यापूर्वीच्यासरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत सदर योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात या सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे.
            शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातर्फे 8 फेब्रुवारी 2019 रोजी याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सन 2018-19 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयासाठी सदर योजनेकरीता 4500 इतके मंजूर उद्दीष्ट होते. त्यात आता 2500 इतके अतिरीक्त उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. आता चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 7 हजार इतके झाले आहे.
            जानेवारी 2019 मध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण)  साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दीष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दीष्ट मंजूर करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यानुसार आता चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात 2500 ने वाढ झाली आहे.
            याआधी 2010-11 मध्ये 512सन 2011-12 मध्ये 950सन 2012-13 मध्ये 370सन 2013-14 मध्ये 220सन 2014-15 मध्ये 1000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 3052 तर सन 2015-16 मध्ये 390सन 2016-17 मध्ये1252,  सन 2017-18 मध्ये 2000 तर सन 2018-19 मध्ये 7000 याप्रमाणे यासरकारच्या कार्यकाळात 10642 इतके उद्दीष्ट चंद्रपूर जिल्हयासाठी निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत या सरकारच्या कार्यकाळात उद्दीष्टातील ही वाढ तिप्पट आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता सदर योजनेचे एकूण उद्दीष्ट 7000 इतके झाले आहे.
            अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात रमाई आवास योजनेसाठी उद्दीष्टात झालेल्या भरीव वाढीमुळे मोठया संख्येने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे.
0000

शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार आर्थिक सहाय्य देणाऱ्या

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जिल्हयात लागू
जिल्हा प्रशासनाला यादी तयार करण्याचा अद्यादेश मिळाला

चंद्रपूर दि. 5 फेब्रुवारी : केंद्र शासनाने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश धडकले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन कामी लागले आहे. या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष सहा हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत आज यासंदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून आलेल्या निर्देशाचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली असून प्रत्येक जिल्हयाने याबाबत अंमलबजावणी करावीअसे निर्देश दिले आहेत.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनीसुद्धा या संदर्भात आज विभागप्रमुखांना तातडीने या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आज आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी गावनिहाय व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून, यासोबतच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाहीसुद्धा क्षेत्रीय स्तरावर सुरु असल्यामुळे योजनेचा लाभ देण्यासाठी अद्ययावत यादी तयार करण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्याचा  तपशील आधार क्रमांक व मोबाईल संदर्भातील माहितीचा समावेश राहणार असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
            केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. कृषी सन्मान योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासोबतच प्रभावी व पारदर्शकपणे पात्र लाभार्थ्यांना प्रती वर्ष सहा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यासाठी जिल्हा, तालुका तसेच ग्रामसमित्या गठीत करण्यात येत आहेत. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच डिस्ट्रीक्ट डोमेन  एक्सपर्ट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी हे सदस्य तर निवासी उपजिल्हाधिकारी हे या समितीचे समन्वय अधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आहेत.
                                                                    000

मिशन सेवा सराव परिक्षा नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी शेवटची तारीख 10 फेब्रुवारी


पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्री कर निरीक्षक पदासाठी सराव

      चंद्रपूर, दि.05 फेब्रुवारी  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हयातील मुलांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढण्यासाठी सुरु झालेल्या अभियानातंर्गत दुस-या सराव परिक्षेला 26 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यासाठी हॅलो चांदा या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेवटची तारीख 10 फेब्रुवारी आहे.
पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्री कर निरीक्षक पदासाठी सराव सत्र आयोजित करण्यात आले असून या परिक्षेवर लक्ष केंद्रीत केलेल्या विद्यार्थ्यांनी या सराव परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी मर्यादित असून या काळात नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी, 3 मार्च, 10 मार्च व 17 मार्च या काळामध्ये सराव परिक्षा देता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी अवघे 5 दिवस बाकी आहे.  या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सामान्य ज्ञान या विषयावर 11 ते 12 या वेळेत एक तासांचा पेपर सोडवून घेतला जाणार आहे. त्यानंतर 12.30 नंतर व्हिडीओ एक्सप्लेनेशन दिले जाणार आहे. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून सेट करण्यात आलेल्या या सराव परिक्षांचा लाभ मुलांनी घ्यावा. तसेच त्यानंतरच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ सुध्दा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या परिक्षेसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना देखील पुन्हा नोंदणी गरजेचे आहे. हॅलो चांदा ॲपवर या संदर्भातील माहिती आपल्याला मिळणार आहे. याशिवाय https://goo.gl/forms/cZAG1s3w0QhCG8df1 या संकेतस्थळावर भेट देता येईल. याशिवाय मिशन सेवा संदर्भात कुठलीही अडचण असल्यास या उपक्रमाच्या सयोजक स्नेहा मेघावत यांच्याशी  मिशनसेवा18ॲटदीरेटजीमेलडॉटकॉम (missionseva18@gmail.comया ई-मेलवर संपर्क साधावा.

रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी - ना.हंसराज अहीर



चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी- रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतुक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतुक विभागाच्या प्रमुख अधिका-यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेलअसे प्रतिपादन केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती चंद्रपूर द्वारा पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेड येथे आयोजित 30 वा रस्ता सुरक्षा अभियान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ना.अहीर बोलत होते. ते म्हणाले कीवाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावीअपघातांचे प्रमाण कमी व्हावे, प्रदुषणावर आळा बसावाअनियंत्रित वाहन चालविणा-यांवर प्रतिबंध बसावा याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक कडक नियम अंमलात आणले आहे. वाहतुक नियमांचा भंग करणा-यांविरूध्द मोठया प्रमाणात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी तसेच राज्य शासन रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर कटाक्षाने अंमल करण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे अपघातांचे आकडे कमी झाले असले तरी सामाजिकदृष्टया अपघाताचे हे गांभीर्य चिंतेत भर घालणारे असल्याने अधिकारीकर्मचारीविविध क्षेत्रातील जबाबदार नागरिकांनी पुढाकार घ्यावा तसेच शाळामहाविद्यालयीन स्तरावर सुरळीत वाहतुकीसंदर्भात तसेच अपघातांच्या पार्श्वमीवर जागृती व्हावी यावर भर देत ना. अहीर यांनी जनजागृतीसाठी पथनाटय हे प्रभावी माध्यम ठरू शकते असे सांगितले. 
रस्ता सुरक्षा हे संबंधित विभागाचे कर्तव्य असले तरी सामाजिक पातळीवर लोकांची याबाबतीत जबाबदारी अनिवार्य ठरते असे सांगत पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहने सोपवितांना त्यांचे वयवाहतुक नियकांचे ज्ञान व वाहन विषयक त्याची मानसिकता आकलन याबाबत गांभीर्याने विचार करूनच पाल्यांच्या हातात वाहने सोपवावी असे आवाहन केले.  
यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत पथसंचालनाद्वारे मानवंदना दिली. पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वाढत्या अपघातांवर नियंत्रण घालण्यासाठी जनजागृती केली. यावेळी निघालेल्या रॅलीस हिरवी झेंडी दाखवून त्यांनी रॅली रवाना केली. या कार्यक्रमास चंद्रपूर महानगराच्या महापौर अंजलीताई घोटेकरजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदेसहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासेवाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपरचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचेसह वाहतुकपोलीसकर्मचारी आदींची उपस्थिती होती. 
चंद्रपूर महानगरातील 12 शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. कार्यक्रमास शहरातील नागरिकस्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधीशिक्षकपालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.                                            000