Search This Blog

Friday, 23 July 2021

शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 5 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

 शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 5 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.22 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 6 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0,  बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 3, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या  0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 967 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 316 झाली आहे. सध्या 117 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 3 हजार 233 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 14 हजार 326 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

00000

अनाथ झालेल्या बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करा- जिल्हाधिकारी गुल्हाने

 


अनाथ झालेल्या बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी

संवेदनशीलपणे काम करा- जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा

चंद्रपूर दि, 23 जुलै : कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमाविल्याने अनाथ झालेल्या बालकांची काळजी, संरक्षण व संगोपनासाठी तत्परतेने कार्य करणे गरजेचे आहे. हे केवळ शासकीय काम म्हणून याकडे बघू नका. तर अशा बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करा. तसेच विधवा झालेल्या महिलांना संबधित योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, याकडेसुध्दा विशेष लक्ष द्या, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व तालुक्याचे उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे, परीविक्षा अधिकारी श्री. दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर उपस्थित होते.

कोरोनामुळे दोन्ही किंवा एक पालक गमावलेल्या बालकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी बालकांशी निगडीत यंत्रणांमध्ये समन्वय घडवून आणणे व बालकांच्या यथायोग्य संगोपनासाठी तसेच आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले की, कोविड-19 मध्ये एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा अनाथ झालेल्या बालकांची यादी जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने तालुका स्तरावर समिती नेमण्यात आली असून अशा बालकांची संपूर्ण मालमत्ता, शिक्षण, संगोपन योग्यतऱ्हेने होत आहे की नाही? अशा बालकांना बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे का? याची खातरजमा करण्याची जबाबदारी समितीची आहे. त्यासाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

            तसेच बालकाच्या पालकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या आईला संजय गांधी निराधार योजना, कुटुंब पेंशन योजना, विमा काढून ठेवल्यास विम्याचा लाभ त्यासोबतच बँकेत पालकांच्या नावे खाते असल्यास त्याचा लाभ मिळवून देणे, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, जन्माचा पुरावा नसल्यास जन्माचा दाखला मिळवून देणे यासारख्या अनुषंगिक बाबींची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी समितीवर आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती असून समितीमधील प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांची जबाबदारी नेमून दिलेली आहे.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, तालुकास्तरावर ज्या अधिकाऱ्याला पालक अधिकारी म्हणून नेमून दिले आहे, त्यांनी आपल्या तालुक्यातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो आहे का याची खात्री करून घ्यावी. जिल्ह्यात कोविडमध्ये 350 बालके अनाथ झालेली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी 179 महिला आहेत. त्यापैकी 35 अर्ज प्राप्त झाले असून 28 अर्जाच्या लाभास मंजुरी मिळाली आहे. उर्वरित महिलांना या योजनेचा लाभ देता यावा यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. बरेच बालक अनाथ झाल्यामुळे बालकांच्या शैक्षणिक व शालेय फी चा प्रश्न उद्भवू शकतो. त्यासाठी शिक्षणाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून फी माफी व्हावी, याकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष घालावे. अनाथ मुले मोठे असतील तर अशा मुलांना कौशल्य प्रशिक्षण देता येईल, 

याअनुषंगाने तंत्र शिक्षण अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. तसेच तालुकास्तरावर संबंधित कार्यवाहीचा दर पंधरवड्याला आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.

00000

Thursday, 22 July 2021

तृतीय पंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना

 तृतीय पंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना

Ø  तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्था व्यक्तींनी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 22 जुलै : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य सचिव आहेत.  

सदर समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती तसेच तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत  संस्थेतील 2 तृतीयपंथीय व्यक्तिंचा ( त्यापैकी किमान एक व्यक्ती ट्रान्सवुमन असणे आवश्यक) चा समावेश आहे. त्यामुळे तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही आहेत समितीची उद्दिष्टे : तृतीयपंथीयांच्या तक्रारीचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे.

असे आहे समितीचे कार्य : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे, जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहित कालावधीत निवारण करणे, तक्रारीबाबत पडताळणी करून आवश्‍यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळास शिफारस करणे तसेच समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा व तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे आदी बाबींवर समिती कार्य करणार आहे.

 

00000

गुरुवारी एकही मृत्यु नाही, 6 कोरोनामुक्त

 

गुरुवारी एकही मृत्यु नाही, 6 कोरोनामुक्त, 5 पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि.22 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 1,  बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 961 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 311 झाली आहे. सध्या 116 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 1  हजार 542 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 12 हजार 842 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.  

000000

जिल्हाधिका-यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 जिल्हाधिका-यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

चंद्रपूर,दि. 22 जुलै : सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. वायाळ, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक  कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता उपविभागीय तथा तालुकास्तरावर गठीत समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. शहरी तसेच ग्रामीण भागात गाव, रस्ते, मोहल्ला आदी ठिकाणांना जातीवाचक नाव असेल तर ते बदलविण्याकरीता ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावा. अशा ठिकाणी पर्यायी नावांचे फलक लावल्यास बोलीभाषेत जातीवाचक नावांचा उल्लेख होणार नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिका-यांनी त्वरीत कार्यवाही करावी. सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात. तसेच संपूर्ण यंत्रणेने अलर्ट राहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी जून 2021 पर्यंतच्या माहितीचा आढावा, अत्याचारग्रस्तांना आर्थिक सहाय्य मंजूर प्रकरणे, ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत पोलिस तपासावर प्रलंबित तसेच न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांची प्रकरणे, अत्याचारग्रस्त व्यक्तिंना जात प्रमाणपत्राचे वाटप, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना, हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती स्थापन करणे आदींचा आढावा घेण्यात आला.

0000000