Search This Blog

Wednesday, 27 October 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर1 कोरोनामुक्त

Ø ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 22

चंद्रपूरदि. 27 ऑक्टोबर :  जिल्ह्यात बुधवारी (दि.27) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर बुधवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 810 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 246  झाली  आहे. सध्या 22 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लाख 30 हजार 404  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी लाख 40 हजार 206 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Tuesday, 26 October 2021

मंगळवारी जिल्ह्यात एक कोरोनामुक्त, एक बाधित तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 23

 

मंगळवारी जिल्ह्यात एक कोरोनामुक्त, एक बाधित तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 23

गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये बल्लारपूर येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 810 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 245 झाली आहे. सध्या 23 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 29 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 38 हजार 932 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

सणासुदीच्या काळात कोविड वाढणार नाही याची दक्षता घ्या. -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 विशेष वृत्त :

सणासुदीच्या काळात कोविड वाढणार नाही याची दक्षता घ्या.

-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर:  कोविडची दुसरी लाट उतरत असल्याचे जरी निदर्शनास येत असले, तरी सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी बाजारात गर्दी करणे टाळावे. कोविड वर्तणूक विषयक नियमांचे पालन कटाक्षाने करावे. दिवाळीच्या तोंडावर बाजारात होणारी गर्दी ही कोविडच्या संक्रमणाला आमंत्रण ठरू नये, याची खबरदारी सर्व नागरिकांनी, विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी घेण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज केले आहे.

शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत शिथीलता दिली आहे. महाविदयालये, औदयोगिक आस्थापना, चित्रपटगृहे व अॅम्युजमेंट पार्क, खेळाडुंच्या सरावासाठी मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमांना अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लसीकरणाव्दारे कोविडवर मात करण्यात येत आहे. नुकतेच देशाने 100 कोटी लसीचा टप्पा पार पाडला आहे. तर दि.23 ऑक्टोबरपर्यत जिल्हयात 17 लक्ष 52 हजार 334  नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य  यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत आहे. मात्र, नागरिकांचा सहभागही मोलाचा आहे. मिशन युवा स्वास्थ अंतर्गत महाविदयालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत महाविद्यालयामध्ये कोविड-19 लसीकरण विशेष सत्राचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकही डोस घेतला नसल्यास, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे व दुसरा डोससाठी पात्र आहे. अशांना दुसरा डोज देण्यात येईल. जे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन लस घेऊ शकतात त्यांनी महाविद्यालयातून लस घ्यावी. किंवा घराजवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. जिल्हयातील ॲक्टीव्ह रूग्णांची दूहेरी संख्या ही काळजी वाढवणारी आहे. तरी, सर्व नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बेरोजगारांसाठी माहितीचा जागर…….

 

बेरोजगारांसाठी माहितीचा जागर…….

ऑनलाईन सत्राचे आयोजन

Ø बेरोजगारांनी सहभाग घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 26 ऑक्टोंबर: कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला परिणामी अनेक हातांचा रोजगार गेला. बेरोजगारांना  रोजगार उपलब्धीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्राद्वारे 27 ऑक्टोंबर रोजी  दुपारी 3 वाजता योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी बेरोजगारांनी पूढाकार घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

रोजगारांच्या बऱ्याच संधी आता नव्याने उपलब्ध होत आहेत. कोरोनाचा प्रभाव लक्षणीयतेने कमी होत  आहे. यासाठीच बँक ऑॅफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या योजनांची माहिती या विषयावर गुगल मिटद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये बँक ऑॅफ इंडिया, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे, संचालक मिलींद इंगळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्याकरीता https:meet.google.com/gwf-hgwe-kkq या लिंकचा अथवा chandrapur.rojgar या फेसबुक प्रोफाईलला भेट देऊन दिलेल्या लिंकचा वापर करावा. तरी, जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.

00000

Monday, 25 October 2021

मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम


मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम

 चंद्रपूर दि. 25 ऑक्टोंबर : मतदार नोंदणीसाठी 13,14 व 26,27 नोव्हेंबर रोजी विशेष् मोहिम राबविण्यात येणार आहे.तरी ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाही अश्या नागरीकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव -नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. इ 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यत दावे व हरकती  स्विकारण्याचा कालावधी राहील . तर 13 व 14 तसेच 27 व 28  नोव्हेंबर रोजी विशेष  मोहिमा राबविण्यात येतील.20 डिसेंबरपर्यत दावे व हरकती निकालात काढता येतील.तर 5 जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसीध्दी करण्यात येईल. विशेष मोहिमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहे.

00000