Search This Blog

Sunday, 27 March 2022

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

चंद्रपूर, दि. 27 मार्च : जिल्ह्यात रविवारी (दि.27) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 388 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 92 हजार 894 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 92 हजार 868 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

००००००

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल



 

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल

Ø विभागीय महसूल परिषदेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने सन्मानित

चंद्रपूर दि.27 मार्च : महसूल विभागाशी निगडीत सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद नुकतीच पार पडली. यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात महसूल विभागातील महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना महसूल परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वनामती, नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (चंद्रपूर), आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संदीप कदम (भंडारा), संजय मीना (गडचिरोली), नयना गुंडे (गोंदिया) उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ‘जमीन विषयक कायद्यातील तरतुदी व सुधारणा’ तसेच ‘अर्ध न्यायीक कामकाज’ याबाबत दोन सत्रात महसूल यंत्रणेला मार्गदर्शन केले. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात महत्वाचे फलनिश्चिती क्षेत्र जसे ऑनलाईन सातबारा, ई – फेरफार, शासकीय महसूल वसुली, सातबारा वाटप, प्रलंबित लेखा परिच्छेद निकाली काढणे, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे याबाबत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना डॉ. करीर म्हणाले, महसूल विभाग अधिक गतिमान करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करत असतानाच महसूल विभागाशी संबंधित सर्व नियम व कायद्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रशासकीय निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करताना सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व पाळणे अपेक्षित असल्याचे सांगताना माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर म्हणाले की, कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी महसूल अधिकाऱ्यांना नियमांचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. निर्णय घेताना कायद्याच्या कसोटीवर असावेत. महसूल परिषदेसारख्या उपक्रमांतून कायदे व नियमांची माहिती सुलभपणे उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शकपणे करणे शक्य होते. असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे म्हणाल्या, महसूल अधिकाऱ्यांनी अर्ध न्यायिक अथवा इतर कोणतेही प्रशासकीय काम करताना प्रामाणिक हेतूने निर्णय घ्यावेत. तसेच कायदे, नियमांमध्ये होणारे बदल समजून घेवून प्रशासकीय कामकाज करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कायद्यांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह विभागातील इतरही जिल्हाधिका-यांनी वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण केले. यात जिल्हाधिकारी आर. विमला (नागपूर) यांनी वित्तीय व आस्थापना विषयक बाबी, प्रेरणा देशभ्रतार (वर्धा) यांनी अधिकार अभिलेख संगणकीकरण, संदीप कदम (भंडारा) यांनी भुसंपादनाची प्रक्रिया व मुल्यांकन, संजय मीना (गडचिरोली) यांनी दंडाधिकारीय कामकाज तर नयना गुंडे (गोंदिया) यांनी गौणखनीज संदर्भात सुधारणा व तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले.

महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या संवर्गातील अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी, तर संचालन आशा पठाण यांनी केले. या परिषदेत नागपूर विभागातील महसूल अधिकारी उपस्थित होते.

०००००००

 

Saturday, 26 March 2022

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

चंद्रपूर, दि. 26 मार्च : जिल्ह्यात शनिवारी (दि.26) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 388 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 92 हजार 594 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 92 हजार 562 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday, 25 March 2022

आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

 

नेरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर 

आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.25 मार्च :  नगर विकास विभागाच्या दि. 24 मार्च 2022 अन्वये शासनाने महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे नेरी (ता. चिमूर) या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी नेरी ग्रामपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्याच्या दृष्टीने प्राथमिक उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे.

या उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत तहसीलदार, चिमूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे त्याबाबत लेखी कारण सादर करणे आवश्यक असेल. या कालावधीत न मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

०००००००

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3

चंद्रपूर, दि. 25 मार्च : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.25) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 958 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 388 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 92 हजार 100 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 91 हजार 969 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

००००००