Search This Blog

Tuesday, 24 December 2024

नझुल जमीनधारकांनी ‘अभय योजना’ विशेष शिबीराचा लाभ घ्यावा

 

नझुल जमीनधारकांनी अभय योजना’ विशेष शिबीराचा लाभ घ्यावा

Ø 26 व 27 डिसेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन

चंद्रपूरदि.24: निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत शासनाच्या वतीने अभय योजना 2024-25’ राबविण्यात येत आहे. नझुल भुखंड धारकातील सत्ताप्रकार ’ मधून ’ मध्ये व लिज नुतनीकरणासाठी चंद्रपूर तहसील कार्यालयाकडून दि. 26 व 27 डिसेंबर 2024 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर शिबीर झोन क्र.1 संजय गांधी मार्केट सिव्हील लाईनझोन क्र.2 चंद्रपूर शहर महानगरपालिका (सात मजली इमारत) व झोन क्र.3 बंगाली कॅम्पचंद्रपूर शहर महानगरपालिका या ठिकाणी होणार आहेत. या शिबीरामध्ये सत्ताप्रकार ’ धारणाधिकार असलेले नझुल भुखंडधारक यांना लागणारे कागदपत्रे व धारणाधिकार बदलण्याची प्रक्रिया याबाबत शिबीरामध्ये अभय योजना 2024-25’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरीसर्व नझुल भुखंडधारकांनी तहसील कार्यालयचंद्रपूर यांचेकडून राबविण्यात येणारी अभय योजना 2024-25’ या विशेष शिबीराचा लाभ घ्यावाअसे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

0000000

Monday, 23 December 2024

लोकाभिमुख कामे करुन प्रशासन गतिमान करा - जिल्हाधिकारी विनय गौडा



 

लोकाभिमुख कामे करुन प्रशासन गतिमान करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूरदि. 23: गुड गव्हर्नस विक-2024 अंतर्गत प्रशासन गाव की और मोहीम दि. 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचून ऑनलाईन सेवा पुरविण्यात येत आहेत. नागरिकांनी शासकिय कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीचे विहित कालावधीत निवारण करणे. प्रलबिंत तक्रारीचा निपटारा करण्यासोबतचजिल्ह्यामध्ये लोकाभिमुख कामे करुन प्रशासन गतिमान करण्याच्या  सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळीनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारसर्व तहसिलदारविविध विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी गौडा म्हणालेसर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने निकाली काढावीत. जनतेच्या समस्या व तक्रारी जाणून घ्याव्यात. 21 दिवसाच्या वर प्रलंबित असलेली तक्रारींची यादी करावी. तसेच सदर प्रकरणे प्रलंबित राहता कामा नये याबाबत दक्षता घ्यावी. केंद्र शासनामार्फत सदर सुशासन सप्ताहाचे मॉनिटरींग केल्या जात आहे. त्यामुळे विभागांनी केलेल्या कामाचे रिपोर्टिंग करावे.  सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्या विभागामार्फत सुशासन संबंधात केलेल्या उत्कृष्ट कामाचीवैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती व संबंधित फोटो सादर करावेत.

 निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार म्हणालेगत चार वर्षापासून गुड गव्हर्नन्स विक साजरा केला जातो. या माध्यमातून जनतेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून कॅम्पेन मोडमध्ये सुविधा व सेवा पुरविण्यात येतात. या सप्ताहात (19 ते 22 डिसेंबरपर्यत) जिल्हा तसेच तालुकास्तरावर विविध विभागाच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरेशेतकऱ्यांना सातबाराजन्म/मृत्यु दाखलाविवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर महत्वपुर्ण दाखले वितरीत करण्यात आले.

००००००

सरपंच पदाकरीता पाच ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित

 सरपंच पदाकरीता पाच ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित

चंद्रपूरदि. 23:  शासन अधिसूचनेनुसार मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल रिट याचीका 4671/2023 मध्ये दि. 10 ऑक्टोंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसारदि. 01 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निश्चित करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी उपरोक्त कालावधीत असलेल्या निवडणुकांकरीता तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे आरक्षण संख्या निश्चित करुन देण्यात आलेली होती.

त्यानुसारचंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडावायगांव मो.पिंपळखुटगोंडसावरी व  चेकनिंबाळा या 5 ग्रामपंचायती करीता संरपच पदाचे आरक्षण सोडत दि. 23 डिसेंबर2024 रोजी दुपारी 2 वाजता तहसिल कार्यालयचंद्रपूर येथे काढण्यात आली.

 या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित:

संरपच पदाचे आरक्षण सोडतीमध्ये तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता पिंपळखुटवायगांव मो.सर्वसाधारण स्त्री करीता गोंडसावरी आणि पांढरकवडा तर सर्वसाधारण प्रवर्गाकरीता चकनिंबाळा या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे.

00000

मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 23:  कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळनवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आले आहे.  https://madhukranti.in/nbb या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना होणारा लाभ :

मधुमक्षिका पालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळते. नोंदणी धारकांना 1 लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर.

नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड (नावजन्मतारीखपत्तासहित)आधार क्रमांकाशी जोडलेला अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांकमधुमक्षिका पालनासंबंधित तपशीलमधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत तसेच मधुमक्षिका पालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो आवश्यक राहिल. तसेच लागणारे नोंदणी शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने अदा करता येईल.

स्व:मालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या (10 फ्रेम) व भरावयाचे नोंदणी शुल्क :

10 ते 100 फ्रेम करीता रु. 250101 ते 250 फ्रेम करीता रु. 500251 ते 500 फ्रेम करीता रु. 1 हजार501 ते 1000 फ्रेम करीता रु. 2 हजार1001 ते 2000 फ्रेम करीता रु. 10 हजार2001 ते 5000 फ्रेम करीता रु. 25 हजार5001 ते 10,000 फ्रेम करीता रु. 1 लक्ष तर 10 हजार पेक्षा अधिक फ्रेम करीता रु. 2 लक्ष नोंदणी शुल्क भरावयाचे आहे.

तरीजास्तीत जास्त मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळनवी दिल्ली 011-23325265,23719025मधुक्रांती पोर्टल Tech Support-18001025026 तसेच महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळपुणे (020) 29703228 या क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

२४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात साजरा होणार पेसा दिवस

 २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात साजरा होणार पेसा दिवस

चंद्रपूर दि.२२: केंद्र शासनाने दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी "पंचायत्ती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६" अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रांतील पंचायतींना स्वयंशासनाच्या संस्था म्हणून काम करणे शक्य होऊ लागले. पेसा कायद्याच्या निर्मितीला दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने हा दिवस "पेसा दिन" म्हणून साजरा करायचे निर्देशित केले आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे समोर ठेऊन, पेसा कायद्याबद्दलची जनजागृती आणि स्वंयशासन संबंधित घटकांच्या क्षमता बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत.

या उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसमा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम जिल्हा, तालुका, तसेच ग्रामस्तरावर आयोजित करण्यात येऊन प्रभात फेरी काढुन व पेसा या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करुन पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये राजुरा, कोरपना, जिवती असे एकुण ३ तालुके पेसा क्षेत्रात येत असुन यातील ९६ ग्रामपंचायत व ग्रामपंचायत अंतर्गत १८२ गावे यामध्ये समाविष्ठ आहेत. यामध्ये तालुक्यानी नियोजीत केलेल्या ठिकाणी तालुका स्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

तरी सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विवेक जॉनसन (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी केले आहे.

००००००