Search This Blog

Thursday, 25 September 2025

पं.स. सभापती पदासाठी आरक्षण सोडतबाबत 1 ऑक्टोबर रोजी सभा


 पं.सभापती पदासाठी आरक्षण सोडतबाबत 1 ऑक्टोबर रोजी सभा

      चंद्रपूरदि. 25 : चंद्रपूर जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधील सभापतीची पदे अनुसूचित जातीअनुसूचित जमातीनागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला यासाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरचंद्रपूर येथे ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजीत करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्षउपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापतीआणि पंचायत समिती (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूकनियम 1962 मधील नियम फ यातील तरतुदीनुसार राज्यातील 32 जिल्ह्यांच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता अनुसूचित जातीअनुसूचित जमातीनागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातींसहआणि महिला (अशा जातीजमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसहयांच्यासाठी राखून ठेवावयाच्या सभापतींची पदे पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जातीकरीता सभापती पदांची संख्या- 1, अनुसूचित जाती (महिलाकरीता सभापती पदांची संख्या – 1, अनुसूचित जमातीकरीता - 1, अनुसूचित जमाती (महिलाकरीता – 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसहकरीता – 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)  करीता – 2, सर्वसाधारणकरीता सभापती पदांची संख्या – 3 आणि सर्वसाधारण  (महिलाकरीता सभापती पदांची संख्या - 3   असे एकूण 15 पंचायत समिती सभापती पदांची संख्या आहे.

तरी सदर सभेला इच्छुक नागरिकांनी उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हाधिकारीचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 2092 रुग्णांची नोंदणी


स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 2092 रुग्णांची नोंदणी

Ø उपजिल्हा रुग्णालय मुल येथे आयोजन

चंद्रपूरदि. 25 : स्वस्थ्य नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मूल येथे  आरोग्य शिबिर घेण्यात आलेया शिबिरात एकूण 2092 रुग्णांची नोंद करण्यात आलीसदर शिबिरात 10 रुग्णांची अंडवृदधी शस्त्रक्रियातसेच 2 रुग्णांवर हरनियाची शस्त्रक्रिया करण्यात आलीशिबिरात 47 रक्तदात्यांनी रक्तदान करण्यात आलेतसेच 137 सोनोग्राफी करण्यात आले व 21 प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरची सेवा पुरविण्यात आली.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालेकार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटरेमा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळेअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकरनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉहेमचंद कन्नकेस्त्रीरोगतज्ज्ञ डॉशीतल सोनारकरवैद्यकीय अधीक्षक डॉदेवेंद्र लाडे तहसीलदार मृदुला मोरेसंध्या गुरनुलेहरीश शर्माचंदू मारगोनवारप्रवीण मोहुर्लेनंदू रणदिवेआदी उपस्थित होते.

चिमूर येथील दिव्यांग शिबिरात 251 जणांची तपासणी : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित  करण्यात आलेल्या दिव्यांग अपंगत्व शिबिरामध्ये 251 रुग्णांची तपासणी करण्यात आलीयावेळी हत्ती पाय रोगमानसिक रोग तज्ज्ञबालरोग तज्ज्ञजनरल मेडिसिन तज्ज्ञअस्थिरोग तज्ज्ञकान नाक घसा तज्ज्ञनेत्रतज्ञ इत्यादी विभागांचे मिळून 191 रुग्णांना  दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात आलेजिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे 21 रुग्णांना पाठवण्यात आलेदिव्यांगाच्या तपासणी शिबिरामध्ये डॉराहुल भोंगलेडॉसंदीप भटकरडॉवंदेश शेंडेडॉरोहन कुमरेराहुल मरसिटीवार यांच्यासह बाळासाहेब चव्हाणदुर्गाप्रसाद बनकर, , आरकेघाटोळेव्ही .सीमसरामअचल टेंबरेसुनिता पडवेकरसुनयना शीरसागरया सर्वांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉअश्विन अगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा बजावली.

००००००

माविम मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम


 

माविम मार्फत महिलांसाठी जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम

चंद्रपूरदि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमअंतर्गत खुशिया लोकसंचालित साधन केंद्र (सी.एम.आर.सी.) चंद्रपूर यांच्या वतीने जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रमांतर्गत ‘ग्रासरूट चॅम्पियन फॉर स्वयंसहायता समूह महिला महाराष्ट्र’ हा विशेष कार्यक्रम नियोजन भवन येथे पार पडला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माविमचे नागपूर विभागाचे विभागीय सल्लागार राजु इंगळेविभागीय उपजिवीका सल्लागार अमित गाडेजिल्हा समन्वय अधिकारी माविम प्रदिप काठोळेसहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रुपेश शेंडेजिल्हा प्रकल्प सल्लागार भुषण मुंजेकरमाहिती प्रणाली सल्लागार अमित चवरेखुशिया लोकसंचालित साधन केन्द्राच्या अध्यक्षा सुनिता गणफाडे,  सचिव उज्ज्वला वरखडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला चंद्रपुर तालुक्यातील विविध स्वयंसहायता समूहातील सुमारे अडीचशेच्यावर महिला लाभार्थी उपस्थित होत्याकार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती थेट महिलांना देण्यात आलीविभागीय अधिकाऱ्यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच काही योजनांचे अर्ज महिलांकडून तत्काळ भरून घेण्यात आलेया उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनउद्योजकता व आर्थिक प्रगतीसाठी दिशा मिळालीउपस्थित मान्यवरांनी महिलांना शासकीय योजनांचा लाभ घ्याआत्मनिर्भर व्हा आणि प्रगतीचा मार्ग वेगाने चालून दाखवा असे आवाहन केले.

कार्यक्रमाला राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागपुरेज्ञानेश्वर गावंडेकल्पना राजुरकरराणी खडसेपुरवठा निरीक्षक भारती दोडकेव्यवस्थापक शारदा हुसे तसेच जिल्ह्यातील उपजिवीका सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

30 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

 30 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

Ø सिर्सी (ताराजुरा) सरपंच अविश्वास प्रस्ताव प्रकरण

चंद्रपूरदि. 25 :   राजुरा तालुक्यातील मौजा सिर्सी येथील लोकनियुक्त सरपंच मंदा रविंद्र किन्नाके यांच्याविरुध्द दाखल झालेल्या तसेच 16 सप्टेंबर 2025 रोजी तीन-चतुर्थांश मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने राजुरा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर ग्रामसभेत खालीलप्रमाणे कामकाज करण्यात येईल. 1. विशेष ग्रामसभा घेण्याकरीता प्रचलीत नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक आहे. 2. विशेष ग्रामसभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करण्याकामी शिरगणना करण्याच्या पध्दतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईलया कामी ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत 29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी ग्राहय धरण्यात येणार आहेत्यामध्ये ग्रामसभा सदस्यांचा सहभाग नोंदविण्यात येईल. 3. सदर विशेष ग्रामसभेकरीता उपस्थित ग्रामसभा सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने व अविश्वास प्रस्तावाचे विरोधात अशा दोन पध्दतीने ग्रामसभा सदस्यांची शिरगणना केली जाणार आहे.

4. सदर दिवशी विशेष ग्रामसभेचे आयोजन हे फक्त अविश्वास प्रस्तावावर अनुसमर्थन घेण्यासाठी असल्याने या  दिवशी इतर विषयांवर चर्चा होणार नाही. 5. विशेष ग्रामसभेत उपस्थित राहुन शिरगणना पध्दतीने ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजुर झाला असेल तर सदरचा अविश्वास प्रस्ताव संमत झालाअसे समजण्यात येईल. 6. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहुन ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास प्रस्ताव फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.

विशेष ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालय सिर्सी ताराजुरा येथे 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहेसदर विशेष ग्रामसभेत येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या पैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहेअसे राजुराचे तहसीलदार डॉओमप्रकाश गोंड यांनी कळविले आहे.

०००००००

पंडित दिनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळावा

 

पंडित दिनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळावा

Ø 30 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथे आयोजन

चंद्रपूरदि. 25 :  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमॉडल करिअर सेंटर आणि इंदिरा गांधी महिला महाविद्यालयघुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वीआयटीआयपदविकापदवी इत्यादी महिला उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नौकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेसदर रोजगार मेळाव्यातून 700 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेजिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करावीतसेच महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त अ.लातडवीयांनी केले आहे.

या नामांकित कंपन्यांचा सहभाग : या मेळाव्यात 1. ओमॅट वेस्ट प्रा.लिचंद्रपूर, 2. राघव फूड्सप्रालिचंद्रपूर, 3. मल्टी ऑरगॅनिक प्रालिचंद्रपूर 4. वैभव  इंटरप्रायझेसनागपूर, 5. विदर्भ क्लिक वन सोल्युशनचंद्रपूर, 6.. संसुर सृष्टी इंडिया प्रा.लि.चंद्रपुर 7.एस.बी.आयलाईफ प्रा.लिचंद्रपूर 8.एलआयसी ऑफ इंडियाचंद्रपूर इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त  पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे.

येथे करा संपर्क : मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती ) उपस्थित राहावेअधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपुर दूरध्वनी क्रमांक 07172-252295  येथे संपर्क करावा.

००००००