Search This Blog

Sunday, 10 February 2019

मिशन सेवा सराव परिक्षा नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी शेवटची तारीख 10 फेब्रुवारी


पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्री कर निरीक्षक पदासाठी सराव

      चंद्रपूर, दि.05 फेब्रुवारी  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हयातील मुलांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढण्यासाठी सुरु झालेल्या अभियानातंर्गत दुस-या सराव परिक्षेला 26 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यासाठी हॅलो चांदा या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेवटची तारीख 10 फेब्रुवारी आहे.
पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्री कर निरीक्षक पदासाठी सराव सत्र आयोजित करण्यात आले असून या परिक्षेवर लक्ष केंद्रीत केलेल्या विद्यार्थ्यांनी या सराव परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी मर्यादित असून या काळात नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी, 3 मार्च, 10 मार्च व 17 मार्च या काळामध्ये सराव परिक्षा देता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी अवघे 5 दिवस बाकी आहे.  या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सामान्य ज्ञान या विषयावर 11 ते 12 या वेळेत एक तासांचा पेपर सोडवून घेतला जाणार आहे. त्यानंतर 12.30 नंतर व्हिडीओ एक्सप्लेनेशन दिले जाणार आहे. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून सेट करण्यात आलेल्या या सराव परिक्षांचा लाभ मुलांनी घ्यावा. तसेच त्यानंतरच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ सुध्दा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या परिक्षेसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना देखील पुन्हा नोंदणी गरजेचे आहे. हॅलो चांदा ॲपवर या संदर्भातील माहिती आपल्याला मिळणार आहे. याशिवाय https://goo.gl/forms/cZAG1s3w0QhCG8df1 या संकेतस्थळावर भेट देता येईल. याशिवाय मिशन सेवा संदर्भात कुठलीही अडचण असल्यास या उपक्रमाच्या सयोजक स्नेहा मेघावत यांच्याशी  मिशनसेवा18ॲटदीरेटजीमेलडॉटकॉम (missionseva18@gmail.comया ई-मेलवर संपर्क साधावा.

रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी - ना.हंसराज अहीर



चंद्रपूर, दि.4 फेब्रुवारी- रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतुक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतुक विभागाच्या प्रमुख अधिका-यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेलअसे प्रतिपादन केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती चंद्रपूर द्वारा पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेड येथे आयोजित 30 वा रस्ता सुरक्षा अभियान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ना.अहीर बोलत होते. ते म्हणाले कीवाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावीअपघातांचे प्रमाण कमी व्हावे, प्रदुषणावर आळा बसावाअनियंत्रित वाहन चालविणा-यांवर प्रतिबंध बसावा याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक कडक नियम अंमलात आणले आहे. वाहतुक नियमांचा भंग करणा-यांविरूध्द मोठया प्रमाणात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी तसेच राज्य शासन रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर कटाक्षाने अंमल करण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे अपघातांचे आकडे कमी झाले असले तरी सामाजिकदृष्टया अपघाताचे हे गांभीर्य चिंतेत भर घालणारे असल्याने अधिकारीकर्मचारीविविध क्षेत्रातील जबाबदार नागरिकांनी पुढाकार घ्यावा तसेच शाळामहाविद्यालयीन स्तरावर सुरळीत वाहतुकीसंदर्भात तसेच अपघातांच्या पार्श्वमीवर जागृती व्हावी यावर भर देत ना. अहीर यांनी जनजागृतीसाठी पथनाटय हे प्रभावी माध्यम ठरू शकते असे सांगितले. 
रस्ता सुरक्षा हे संबंधित विभागाचे कर्तव्य असले तरी सामाजिक पातळीवर लोकांची याबाबतीत जबाबदारी अनिवार्य ठरते असे सांगत पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहने सोपवितांना त्यांचे वयवाहतुक नियकांचे ज्ञान व वाहन विषयक त्याची मानसिकता आकलन याबाबत गांभीर्याने विचार करूनच पाल्यांच्या हातात वाहने सोपवावी असे आवाहन केले.  
यावेळी ना. हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत पथसंचालनाद्वारे मानवंदना दिली. पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वाढत्या अपघातांवर नियंत्रण घालण्यासाठी जनजागृती केली. यावेळी निघालेल्या रॅलीस हिरवी झेंडी दाखवून त्यांनी रॅली रवाना केली. या कार्यक्रमास चंद्रपूर महानगराच्या महापौर अंजलीताई घोटेकरजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदेसहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासेवाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपरचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचेसह वाहतुकपोलीसकर्मचारी आदींची उपस्थिती होती. 
चंद्रपूर महानगरातील 12 शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. कार्यक्रमास शहरातील नागरिकस्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधीशिक्षकपालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.                                            000

उपचाराच्या चौकटीतून बाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ.बंग



7 व्या व्यसनमुक्ती संमेलनाचा चंद्रपूरमध्ये थाटात समारोप

चंद्रपूर, दि.3 फेब्रुवारी - राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनामुळे एक सकारात्मक उर्जा निर्माण केल असूनही ऊर्जा व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. येथे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक कार्यकर्त्याना पुरस्कार मिळाला त्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. यापुढेही जबाबदारीने त्यांनी व्यसनमुक्तीसाठी काम करावे. व्यसनमुक्तीसाठी केवळ उपचार या चौकटीत न राहता या चौकटीबाहेर निघून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सांगता आज रविवारी झाली. यावेळी समारोपीय कार्यक्रमात डॉ. बंग बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष डॉ. अभय बंगडॉ. राणी बंगशारदा बडोलेआमदार नानाजी श्यामकुळेमहापौर अंजली घोटेकरसुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाडकीर्तनकार तुषार सूर्यवंशीनशाबंदी मंडळाच्या वर्षा विलाससमाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त खंडातेचंद्रपूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बंग म्हणालेव्यसनमुक्तीसाठी राज्यसरकारला जी मदत करता येईलती यापुढेही आपण करणार असूनव्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी नेहमीच सरकारसोबत राहूअशी ग्वाही डॉ. बंग यांनी दिली.    
आजचे आकर्षण ठरलेले व्यसनमुक्ती प्रसार माध्यमे आणि साहित्यिकांची जबाबदारी या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले नागपूर येथून प्रकाशित होणारे दैनिक सकाळचे संपादक शैलेश पांडे, दैनिक तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, दै.लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गांवडे,  दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, नितीन कुळकर्णी यांनी दारुमुक्ती हाच पर्याय पुढे असल्याचा सुर या वक्त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक शिक्षणापासून याबाबतच्या जागृतीला प्रारंभ व्हावा, अनेक वेळा दारुबंदी हा उपाय ठरू शकत नाही. दारुमुक्तीलाच प्राधान्य देणे योग्य ठरेल असा सुर व्यक्त केला.
सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे काळाची गरज असूनयासाठी आपणा सर्वांना पुढे येऊन एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी यांनी केले. 
याप्रसंगी निवडणुका दारूमुक्त करणेदारूबंदीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करणेगावपातळीवर सामूहिक व्यसनमुक्त गट निर्माण करणेमतदान केंद्रांवर ब्रिथलायझर मशीन उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाचे तेरा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, डॉ. निशीगंधा वाडतुषार सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले.
आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री निशींगंधा वाड   समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी  आदी  मान्यवर उपस्थित होते. यावेळी तुषार सुर्यवंशी यांना दुसरा संत चोखा मेळावा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.  तर या सन 2018-19 मधील महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्ती  व संस्थांचाही  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला
पुरस्कार विजेत्यांची नांवे
सन 2018-19 मध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नावे  विजयकांत मंगेश सागर वसई जि.पालघर, अशोक जयवंत गजभिये खडकपाडा, माया हनुमंत मोरे सानपाडा, डॉ.जित बळवंत मगदूम बेलापूर ठाणे, अर्पिता राजेंद्र मुंबरकर विद्यानगर जि.सिंधुदूर्ग, शाहीर रामचंद्र नायकू जाधव मिरज व डॉ.बाळासो निवृत्ती कर्पे विटा जि.सागली, शाहीर शहाबुद्दीन कादर शेख नागठाणे जि.सातारा, ज्योती विजय देशमुख लखमापूर जि.नाशिक, शाहीर बलभीम महादू शिंदे टाकळी ढोकेश्वर व डॉ.रंजना पगार गवांदे संग्राम जि.अहमदनगर, संदीपपाल गजानन गिते महेशनगर व श्रीकृष्ण पखाले गुरुकुंज जि.अमरावती, समीर खंडू जाधव कामशेत, प्रकाश केशव वायंगणकर व नितीन अच्युत देऊस्कर मुक्तांगण विश्रांतवाडी आणि राजेंद्र दत्तात्रय कदम राजेगाव जि.पुणे, एकनाथ चंदर कुंभार सडोली जि.कोल्हापूर, श्रीमती माया धांडे व सुभाष गुलाबराव सवडतकर जि.बुलढाणा, गुरुनाथ रामचंद्र पेंढारकर तांदळी, अमरजितसिंग पी संतबाबा नगिनाघाट रोड, डॉ.चंदा जयराम बहरेवाडा व प्रा.दीपक बाबूराव पानसकर जि.नांदेड, सुरेंद्रकुमार रावजी ठाकरे बोंडगाव देवी जि.गोंदिया, बंडूपंत राजेश्वर बोढेकर मु.जि.गडचिरोली, श्री.विनोद मेश्राम जि.चंद्रपूर, राजेंद्र समाधान भटकर मुरंबा जि.अकोला, पंकज खंडूसिंग राठोड रुई, संजय मधुकर कडोळ कारंजा व  ह.भ.प.श्रीकृष्ण बाबाराव राऊत वाशिम जि.वाशिम, सुनील जगन गुजर आमरखेडा, ह.भ.प.नवनाथ विनायकराव आंधळे शिवनेरी कॉलनी व शाहीर सुरेश जाधव जि.औरंगाबाद, लालासाहेब राजेसाहेब देशमुख शिलानगर जि.लातूर, बाबुराव धोंडिया जोगदंड पांगरा जि.हिंगोली, डॉ.रमेश शिंदे परभणी व नितीन सोमनाथ विसपुते चेतना व्यसनमुक्ती केंद्र जळगाव यांना देण्यात आला आहे.
तर सन 2018-19 मध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या संस्थांची नावे- वर्ल्ड रिन्यूअल स्पिरीच्युअल ट्रस्ट कल्याण जि.ठाणे, संकल्प बहुद्देशीय युवा संस्था राजुरी व नवजीवन प्रतिष्ठान निगंडी जि.पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ गुरुदेवनगर जि.अमरावती, कै.सोपानराव तांदळापूर क्रीडा मंडळ व व्यायामशाळा कुंचेली जि.नांदेड, प.पूज्य श्री शेषरावजी महाराज व्यवसनमुक्ती संघटना चंद्रपूर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूर, सहारा व्यसनमुक्ती केंद्र बीड बायपास जि.औरंगाबाद, गुरुदेव शिक्षण संस्था कुरखेडा जि.गडचिरोली व श्री विलासराव हावळे बहुद्देशीय सामाजिक संस्था भंडीशेगाव जि.सोलापूर या संस्थांना वितरीत करण्यात आला आहे.
                                                   0000

सामान्य माणसाला सर्वच क्षेत्रात न्याय मिळावा हेच विधी सेवेचे प्रमुख कर्तव्य : न्यायमूर्ती अभय ओक




मूल येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या
महाशिबिरात लाखावर लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

चंद्रपूर ( मूल ) दि, 3 फेबुवारी  - सामान्यातल्या सामान्य माणसाला  त्याचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. यासाठी प्रसंगी यंत्रणेसोबत काम करणे हे देखील विधी सेवेचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विविध शासकीय योजनाचा सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे आयोजित महाशिबिराला संबोधित करताना ते रविवारी बोलत होते.
मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणावर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईजिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा परिषद कार्यालयजिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विकास योजनांची प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी तसेच विधी साक्षरता आणि शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर रविवारी आयोजित करण्यात आले होते.
या महाशिबिराच्या व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.के. देशपांडेन्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडेन्यायमूर्ती एम. जी. गिरटकरविधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एस.के. कुळकणींजिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरप्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नितीन आर.बोरकर आदी उपस्थित होते.
न्याय सर्वांसाठी. हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे. सामान्य माणसाला त्यांच्या अधिकाराची माहिती व्हावीसमान न्यायाची सर्वांना हमी मिळावी. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करते. राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत शासकीय योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये महाशिबीर आयोजित करण्यात येतात. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल असणाऱ्या मूल या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची माहिती व्हावी व लाभार्थ्यांना या शिबिरामध्ये योग्य तो लाभ मिळावा यासाठी या महाशिबीराचे आयोजन केले होते. या ठिकाणी आदिवासी विकाससमाजकल्याणकृषीग्रामीण विकासमहिला व बालकल्याण,आरोग्य शिक्षण व कौशल्य विकास,पोलीस,परिवहन बँका व आर्थिक विकास महामंडळ अशा वेगवेगळ्या विभागाच्या 80 स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या शिवाय प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी संबंधित स्टॉलवर उभे होते. यावेळी त्यांनी विविध योजनेतील लाभार्थ्यांना स्टॉलवरच लाभ देण्याची सुविधा उपलब्ध केली होती. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा या ठिकाणी तैनात होती. त्यामुळे एकाच दिवसात एक लाखावर लाभार्थ्यांना विविध योजनांतून लाभ देण्यात आला.
यावेळी आपल्या संक्षिप्त प्रमुख संबोधनामध्ये न्यायमूर्ती अभय ओक यांनी केवळ न्यायालयात न्याय देणे हेच विधी सेवेचे कार्य नसून जनतेला न्याय हक्क मिळण्यासाठी सर्व प्रयत्न करणे, कर्तव्याचा भाग ठरते. योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे काम शासकीय यंत्रणांचे आहे. तथापि,यामध्ये आम्ही देखील सहभागी होऊन योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.खेमनार यांनी एक लाखावर लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ मिळत असल्याबाबतची माहिती प्रास्ताविकात दिली होती. त्याचा उल्लेख करून त्यांनी या एक लाख लाभार्थ्यांना खरोखर लाभ मिळाला काय याचा आढावा पुढील काळातही राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत घेतला जाईल, असे सांगितले.
यावेळी मूळचे कोरपना तालुक्यातील असणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरटकर यांनी स्थानिक भाषेमध्ये उपस्थितांशी संवाद साधला. विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायालय आपल्या दारी ही संकल्पना असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी छोटी-मोठी भांडणं  गाव गावपातळीवर सोडविण्याचे आवाहन केले. शेताच्या धुऱ्यासाठी वावर पाडू नका असा संदेश दिला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश बोरकर यांनी  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन ते चार गावांना एकत्रित मदत करणारे लीगल हेड क्लीनिक सुरू करावेतअशी इच्छा व्यक्त केली. न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना  जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सर्व विभागाला मार्गदर्शन करणाऱ्या विधी यंत्रणेचे जेष्ठ आपल्या जिल्ह्यात येऊन लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत प्रयत्न करत असल्याचा आनंद व्यक्त केला. विधी क्षेत्रातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन व त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची ही एक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या महाशिबीरामध्‍ये 22 विभाग एकत्रीत आले असून  एक लाखावर लाभार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य सचिव एस. के. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन संजय यादव यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बोरकर यांनी केले. या कार्यक्रमात घरकुलपशुखाद्य ,शिष्यवृत्तीसिंचनविहिरीसेंद्रिय खत वाटपविद्युत पंप वाटपबायोगॅसनैसर्गिक अनुदान वाटप,शबरी आवास योजना, रमाई आवासप्रधानमंत्री आवास योजनामाझी कन्या भाग्यश्री योजना,स्वयं सहायता निधी गट वाटप योजनाकृषी स्वावलंबन योजनाबिरसा मुंडा कृषि क्रांती योजनाराष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ,बाबासाहेब आंबेडकर आवास योजना आदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना न्यायमूर्ती महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्र व लाभाच्या वस्तू देण्यात आल्या. याठिकाणी लावण्यात आलेल्या सर्व स्टॉलला  यावेळी न्यायमूर्तींनी भेट दिली व प्रत्येक स्टॉल मधील उपक्रमांना जाणून घेतले. सावली, सिंदेवाही, पोंभूर्णा, मुल या तालुक्यातील जनता प्रामुख्याने या महाशिबीरात दाखल झाली होती. यावेळी विविध लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची सोय लक्षवेधी होती. उपजिल्हा रुग्णालयात या महाशिबीराच्या निमित्ताने गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. पोलीस विभागाने देखील प्राथमिक जागरुकतेचा स्टॉल या ठिकाणी उभारला होता. या एक दिवसाच्या शिबिराला मोठ्या संख्येने ग्रामीण जनतेने उपस्थिती लावली होती.
                                                            0000

व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे : --- ना.सुधीर मुनगंटीवार





सनमुक्तीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :
ना.बडोले यांनी दिला महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्याचा संदेश
1 टक्का अबकारी कर व्यसनमुक्तीसाठी खर्च करणार
चंद्रपूरमधील दारूबंदी ही जनतेसाठी डायरेक्ट कॅश ट्रॉन्सफर योजना
चंद्रपूरमध्ये 7 व्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
लक्षवेधी दिंडीने चंद्रपूर महानगराचे लक्ष वेधले
शाळा व महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
व्यसनाधीनता सोडविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या स्टॉलवर गर्दी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

चंद्रपूर, दि. 2 फेबुवारी : व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी तरुणांनीविद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून आपला वेळ द्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला चंद्रपूरमध्ये शनिवारी थाटात शुभारंभ झाला. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यसनमुक्तीसाठी लढा उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
आज सकाळी स्थानिक ज्युबिली हायस्कूल या ठिकाणावरून निघालेल्या व्यसनमुक्ती दिंडीला संमेलनाध्यक्ष डॉ.अभय बंग यांनी शुभेच्छा दिल्या. व्यसनमुक्त समाज हे या कार्यक्रमाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या संदेशात स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले,  आमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शहराच्या मुख्य रस्त्यांवर ही लक्षवेधी व्यसनमुक्ती दिंडी आकर्षणाचे केंद्र झाली. चंद्रपूरातील अनेक महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
बारा वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  मंत्री राजकुमार बडोले  होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. व्यासपीठावर  राज्याचे वित्तनियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग, सामाजिक न्याय राज्यमंत्री  दिलीप कांबळेआमदार नानाभाऊ शामकुळेजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी  आदी  मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांदा क्लब मैदानावर व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांमार्फत महाराष्ट्रव्यापी व्हावा, असे आवाहन केले. निर्व्यसनी माणसाकडे उत्तम आरोग्यउत्तम दिशा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कामांमध्ये पुढाकार घ्यावा. आपला वेळ द्यावा. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढे यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केले.
चंद्रपूर ही पराक्रमी वाघाची भूमी असून ही भूमी लढवय्याचा जिवंत इतिहास आहे. या ठिकाणच्या केलेल्या दारूबंदीचा उल्लेख करून त्यांनी सर्व क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी नवी पिढी निर्माण करणारी ही भूमी व्यसनाधीन होता कामा नये ,यासाठी कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सोबतच राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी केवळ चंद्रपूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेतल्याबद्दल चंद्रपूरच्या जनतेच्यावतीने त्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आभार देखील मानले. यावेळी त्यांनी दारु उत्पादक शुल्क विभागाला मिळणा-या करातून 1 टक्का कर व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी देण्याचे मान्य केल्याचे सांगितले.
महात्मा गांधी यांनी 1923 मध्ये भारत व्यसनमुक्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईलअसे सांगितले होते. महात्मा गांधींची ही 150 वी जयंती असून गांधीजींच्या स्वप्नातला भारत देश साकारण्यासाठी व्यसनमुक्तीच्या कामांमध्ये मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी युवकांना केले. ते म्हणालेव्यसन करण्यासाठी पैशांची गरज असतेमात्र व्यसन सोडण्यासाठी एका पैशाची सुद्धा गरज नाही. भारत ही प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. अनेक संस्कृती आल्या आणि लयाला गेल्या. मात्र भारतीय संस्कृती अद्यापही टिकून आहे. या सुसंस्कृत देशांमध्ये व्यसनाधीन मुलाने आईचा खून करणे अशा बातम्या ऐकायला येऊ नये, असे  आवाहनही उपस्थित तरुणाईला त्यांनी केले.
यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारुबंदीचा घेतलेल्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये कपात झाल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट केले. सामाजिक सौहार्द वाढल्याचेही या काळात सिद्ध झाल्याचे त्यांनी पोलिसांकडून आलेल्या आकडेवारीसह स्पष्ट केले.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदीच्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यसनमुक्तीचा मोठा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याबद्दल त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे कौतुक केले. व्यसनमुक्त समाज हे संतानी पाहिलेले स्वप्न आहे. महाराष्ट्रमध्ये गावागावांमध्ये ही चळवळ उभी राहिली आहे. हा समाज व्यसनमुक्त नसला तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे पंजाब मधील व्यसनाच्या विळख्याने सिद्ध केले. त्यामुळे देशासाठी व स्वतःसाठी व्यसनमुक्त जीवन असावेअसे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी साधु, संत मंडळींनी आपल्या संस्कृतीमध्ये व्यसनमुक्तीचे बीज पेरले आहे. भारत हा तरुणांचा देश असून सध्या सर्वाधिक तरुण वयाची लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळेही युवाशक्ती व्यसनमुक्त असावी. व्यसनमुक्तीचा संदेश जागतिक व्हावा यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अबकारी कराचा एक टक्का प्रबोधनासाठी देण्याबाबत वित्तमंत्री ना.मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी आभार व्यक्त केले.  राज्य शासनाने नव्या पिढीला व्यसनाधिनतेतून दूर काढण्यासाठी अनेक निर्णय घेतले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी देखील संबोधित केले. तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे यासाठी मोठ्या प्रमाणात सामाजिक न्याय विभाग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या देशाचे भविष्य तरुण पिढी आहे. ही पिढी सुदृढ व निर्व्यसनी असावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग यांनी यावेळी चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केल्यानंतर झालेल्या सामाजिक परिवर्तनाची आकडेवारीसह माहिती दिली. दारू व तंबाखू हे नवे कॉलरा-प्लेग असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात राज्याने गेल्या सत्तर वर्षांमध्ये दारूबंदी केल्यानंतरही विकासामध्ये आगेकूच कायम ठेवली आहे. त्यामुळे दारूबंदीमुळे विकासावर परिणाम होतो हे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाल्यानंतरच्या परिणामाचे त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. यामध्ये चंद्रपूर मध्ये दारूबंदी झाल्यामुळे वार्षिक जवळपास 87 कोटी रुपये सरळ सरळ लोकांच्या खिशात वाचले. त्यामुळे चंद्रपूरसाठी दारूबंदी म्हणजे लोकांच्या खिशात डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे. यावेळी गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुक्तीपथ प्रयोगाबाबत ही त्यांनी माहिती दिली.
सिने अभिनेत्री अनिता दाते केळकर यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.
पुरस्कार
सन 2017-18 मध्ये पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नावे  मुंबई येथील रश्मी पुराणिक, भीमराव शिवराव मगरे, श्रावणी सतीश मदभावे- सिंधूदुर्ग, बाजीराव काशिनाथ दीक्षित, अनंतराव सीताराम दरवसे, केशव धोंडीबा चौधरी, शाहीर  हेमंतराजे पुरुषोत्तम मावळे पुणे, किशोर काळोखे-सातारा, सर्जेराव कृष्णा कचरे, सचिन ज्ञानदेव खांडेकर, राजेंद्र बाबुराव पाटील सांगली,  समीर सुधाकर देशपांडे, दिग्विजय एकनाथाराव देशमुख कोल्हापूर, सुधीर नारायण वसाने जळगाव, निवृत्ती काशिनाथ देशमुख अहमदनगर, पुष्पावती मधुकर पाटील नाशिक, लक्ष्मण मेहर नागपूर, संध्या प्रतिक राऊत व अनिल वामन डोंगरे चंद्रपूर, दयाराम कवळू पंधरे, जयंत मदनलाल शुक्ला व राहुल विनायकराव जोशी गोंदिया, नंदकिशोर दिवाकर काथवटे व ठुमेश्वर पुडलिक मने गडचिरोली, डमदेव पांडुरंग कहालकर भंडारा, डॉ.धनजय विठ्ठल हंगे, स्वप्नील विलास चंदने व निरंजन मुरलीधर भाकरे औरंगाबाद, शाहीर नानाभाऊ उत्तमराव परिहार जालना, खान अब्दुल रशीद रहमान व तत्वशील बाबुराव कांबळे बीड, अजिनाथ दशरथ शेरकर लातूर, मारोती तुकाराम पवार नांदेड, जयकृष्ण अजाबराव खडसे व शिवजमंगल हिरामण चव्हाण  अमरावती, प्रेमलता प्रकाश सोनोने बुलडाणा व सुचिता पाटेकर यवतमाळ यांचा समावेश आहे. 
तर सन 2017-18 मध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या संस्थांचे नाव- गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबई, भूमिका फाउंडेशन रायगड, विनायकराव जोशी काका सेवा संस्था सावळज जि.सांगली, सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर, ग्रामीण विकास संस्था पाडळी जि.औरंगाबाद, गुरुदेव सेवा आश्रम उत्तमसरा नागपूर, राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था सुंदरखेद बुलडाणा, गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा जि.गडचिरोली, लोकविकास सामाजिक संस्था नाशिक व राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठान देगलूर जि.नांदेड यांना देण्यात आले आहे.
                                                                   0000