Search This Blog

Monday, 4 April 2022

इरई नदीचे खोलीकरण आणि स्वच्छतेमुळे पुराचा धोका टळणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 








इरई नदीचे खोलीकरण आणि स्वच्छतेमुळे पुराचा धोका टळणार
 
  

                       - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø पडोली येथे गाळ उपसा कामाचा शुभारंभ

चंद्रपूर दि. 4 एप्रिल : इरई नदी ही 8 ते 10 किलोमीटर शहराला समांतर वाहते. गत काही वर्षांपासून या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच वाढलेली झुडपे आणि अस्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांत शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे इरई नदीचे खोलीकरण, पूर संरक्षणात्मक कामे आणि नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली असून त्यामुळे पुराचा धोका टळणार व नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.   

इरई नदी गाळ उपसा व स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे, एस. एस. दाणी, प्रकाश देवतळे, शिवानी वड़ेट्टीवार आदी उपस्थित होते.

वर्धा नदिला पूर आला की इरई नदीच्या बैकवॉटरमुळे शहराला पूराचा धोका संभावतो असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, या नदीच्या खोलिकरणाची आणि स्वच्छतेची लोकांची मागणी होती. त्यामुळे खोलिकरणाच्या कामाचा शुभारंभ हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. शासनाने या कामाला मंजूरी दिली असून राज्य सरकारच्या निधीसोबतच आपत्ती व्यवस्थापन मधून 50 कोटी दिले जाईल.

तसेच सर्व्हेच्या माध्यमातून कमी वेळात किती गाळ काढायचा आहे, ते या पहिल्या टप्प्यात लक्षात येईल. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात नदीच्या दोन्ही काठांचे सौंदर्यीकरण, गँबियन बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. शहराचा 1/3 भाग इरई नदीच्या "ब्लू लाइन" मध्ये येतो. त्यामुळे उथळ झालेल्या या नदीचे खोलिकरण आवश्यक होते. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने हे काम सुरू केले असून खोलिकरण व स्वच्छतेमुळे भविष्यात पूराचा धोका राहणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नदीतून काढलेला गाळ शेतीच्या उपयोगी पडतो. ज्या शेतकऱ्यांना हा गाळ शेतीसाठी न्यायचा असेल त्यांना जलसंपदा विभागाने हा गाळ मोफत उपलब्ध करून द्यावा, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी जलसंपदा आणि महसूल विभागाला दिल्या.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, चंद्रपूर शहरासाठी इरई नदी वरदानच आहे. गत काही वर्षात गाळ उपसा न झाल्यामुळे पूराचा धोका संभावतो. त्यामुळे पूर प्रतिबंध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या कामाला सुरवात करण्यात आली आहे. ठराविक वेळेत जलसंपदा विभागाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रस्ताविकातून कार्यकारी अभियंता श्री. काळे यांनी सांगितले की, यांत्रिकी आणि स्थापत्य विभागाच्या समन्वयाने हे काम होणार आहे. पडोली ते चौराह पूल या 7.5 किमी च्या टप्प्यात गाळ काढणे व खोलिकरणाचे काम सुरू करण्यात येत आहे. यातून अंदाजे 5 लक्ष क्यूबिक मीटर गाळ निघणार असून त्यासाठी सहा कोटी रुपये खर्च येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मशीनची पूजा आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

00000

Sunday, 3 April 2022

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

 चंद्रपूर दि. 3 एप्रिल: जिल्ह्यात र‌विवारी (दि.3) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 391 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 94 हजार 867 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 94 हजार 835 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Saturday, 2 April 2022

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

 चंद्रपूर दि. 2 एप्रिल: जिल्ह्यात शनिवारी (दि.2) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 391 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 94 हजार 815 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 94 हजार 753 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday, 1 April 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 2 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता विठ्ठल रुक्मिणी सभागृह, ब्रह्मपुरी येथे  सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पदाधिकारी यांच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता मौजा अड्याळ तुकुम ता. ब्रह्मपुरी येथे विपश्यना केंद्रास भेट. सायंकाळी 4.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अभ्यांगतांना भेटीसाठी राखीव. सायंकाळी  6 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

रविवार, दि. 3 एप्रिल 2022 रोजी  दुपारी 12 वाजता यवतमाळ येथून चंद्रपूर कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता विश्वकर्मा भवन, मुल रोड, चंद्रपूर येथे लोहार समाज पोटजाती विकास संस्था, चंद्रपूर तर्फे विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व विश्वकर्मा जयंती महोत्सवास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात चंद्रपूर येथे अभ्यांगतांना भेटीसाठी  राखीव. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

सोमवार, दि. 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता इरई नदीच्या खोलीकरण व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेच्या विकास कामासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात ताडोबा सफारी गेट सुशोभीकरणाचे सादरीकरण. दुपारी 2.30 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कामगारांच्या विविध समस्या संदर्भात सर्व सीमेंट प्लांट प्रमुख व कामगार प्रतिनिधींची बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथील बोटॅनिकल गार्डनला भेट व पाहणी. सायंकाळी 6.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 2

चंद्रपूर दि. 1 एप्रिल: जिल्ह्यात शुक्रवारी (दि.1) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 960 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 391 झाली आहे. सध्या 2 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 94 हजार 466 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 94 हजार 385 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000