Search This Blog

Wednesday, 5 March 2025

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेचे अर्ज 10 मार्चपर्यंत सादर करा


 मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेचे अर्ज 10 मार्चपर्यंत सादर करा

चंद्रपूरदि.5 मार्च : अनूसूचित जाती प्रवर्गातील ‍विद्यार्थ्याकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती,  फ्रीशिपराजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीव्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन  व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना या पाच योजनांचे नविन  व  नुतनीकरणाच्या अर्जाची महाडीबीटी प्रणालीद्वारे स्वीकृती सुरू झाली आहे.

महाडीबीटी प्रणालीवर ज्या ‍विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी केलेली नाही वा मागील वर्षातील अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहे, अशा अर्जदारास  त्यांचा अर्ज सादर करण्याबाबत महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी  लेखी सूचना निर्गमित कराव्यात. तसेच‍ विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज सादर न केल्यास सदर योजनेच्या लाभापासून अर्जदार वंचित राहिल्यास याची  सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, याची विद्यार्थ्यांनी दखल  घ्यावी, अशाही सूचना देण्यात याव्या. तसेच महाविद्यालयाने प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची  नोंदणी  होईल या दृष्टिने प्रयत्न करावेत.

महाडीबीटी प्रणालीवरील द्वितीयतृतीय व चतुर्थ वर्षाकरिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे  नूतनीकरणाच्या अर्जाकरिता प्रथम प्राधान्य देऊन सदर अर्ज प्राचार्यांनी निकाली  काढावेत. प्रथम वर्षातील ज्या अभ्यासक्रमांचे संबंधित शैक्षणिक यंत्रणा/ विभागामार्फत महाविद्यालयांचे शैक्षणिक  शुल्क मंजुर झालेले आहे, अशा द्यमहाविद्यालयांनी नविन अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सर्व दस्ताऐवजांची पडताळणीअभ्यासक्रम शुल्कआधार बँक लिंकस्थितीइत्यादि बाबींची खातरजमा सर्व  अर्ज 10 मार्च 20254 पर्यत  जिल्हा कार्यालयास तात्काळ पाठवावेत.

महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी  जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहिल, असे सहाय्यक आयुक्तसमाजकल्याण  यांनी कळविले आहे.

०००००

Tuesday, 4 March 2025

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित


 चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित

Ø जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची मंत्रालयात दखल

चंद्रपूर, दि. 4 मार्च : बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या  नेतृत्वात महिला व बालविकास विभागाने बाल विवाह प्रतिबंधक कायदाबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदाअनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, POCSA यासारख्या काय‌द्याची प्रभावी अंबलबजावणी करून बाल संगोपन योजनेसाठी अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ‘बालस्नेही’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेराज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमनिषा कायंदेमहाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहाआयोगाचे सदस्य प्रशांत नारनवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्या सोबतच दीपक बानाईत यांना 'बालस्नेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीहा वैयक्तिक पुरस्कारबाल कल्याण समिती चंद्रपूर यांना 'बालस्नेही सीडब्ल्यूसीपुरस्कार तसेच बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांना 'बालस्नेही डीसीपीयूपुरस्कार प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार मिळाले आहेत.

जिल्हा प्रशासनाची मंत्रालयात दखल : तीन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा नुकताच मंत्रालयात सत्कार करण्यात आला होता. तर आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एकप्रकारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल मंत्रालय स्तरावर होत असून जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.

००००००

मार्च अखेरपर्यंत जलयुक्त शिवारची 100 टक्के कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी विनय गौडा


 

मार्च अखेरपर्यंत जलयुक्त शिवारची 100 टक्के कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूरदि. 04 मार्च : जलयुक्त शिवार अभियान 2.0 ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा शासन स्तरावरून नियमित आढावा घेतला जातो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी मार्च 2025 पर्यंत जलयुक्त शिवारची सर्व कामे 100 टक्के पूर्ण करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, श्वेता बोड्डू, मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता निलीमा मंडपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. 

जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू होऊन आता दोन वर्षे झाली आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या योजनेंतर्गत कामे प्रलंबित असेल तर संबंधित यंत्रणेने गांभिर्याने लक्ष देऊन ती पूर्ण करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत मार्च अखेरपर्यंत 100 टक्के कामे पूर्ण व्हायला पाहिजे. कामे, निविदा, निधी आदींबाबत काही अडचण असल्यास तात्काळ कळवा. प्रलंबित कामांचा प्रत्येक यंत्रणेने नियमित पाठपुरावा करावा. ई-निविदा करून सर्व कामांचे कार्यारंभ आदेश त्वरीत द्या. कृषी विभागाकडे प्रलंबित कामे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी सर्व तालुका कृषी अधिका-यांची प्रत्येक आठवड्यात बैठक घ्यावी  व कामे पूर्ण करण्याबाबत सुचना द्याव्यात. तसेच प्रत्येक आठवड्यात कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा.

यावेळी जिल्हाधिका-यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे सुरू असलेले कृषी विभाग, वन विभाग, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा, नरेगा, लघुसिंचन या विभागांच्या कामाचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत एकूण 233 गावांची निवड करण्यात आली असून एकूण 3320 कामे सुरू आहेत, असे कार्यकारी अभियंता निलीमा मंडपे यांनी सांगितले.

००००००

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सायकल रॅली

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत  सायकल रॅली

          चंद्रपूरदि. 4 मार्च :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत साई मुंबई च्या निर्देशानूसार फिट इंडिया सायकल ऑन संडे  हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील खेलो इंडियाच्या तसेच इतर खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने चंद्रपूर शहरातून सायकल 10 किलोमीटरपर्यंत जनजागृती घोषणा करीत रॅली काढण्यात आली. या उपक्रमाला खेलो  इंडियाचे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकरमनोज पंधरामनंदू अवारेमोरेश्वर गायकवाडक्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेसंदिप उईकेरंजना शेवतकर व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.

प्रदुषणमुक्त व आरोग्यदायी उपक्रम : सायकल चालविणे हा शरारासाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. याशिवाय प्रदूषणमुक्त शहर ठेवणेइंधन  बचत करणेशारीरिकदृष्ट्या स्वत:ला मजबूत ठेवणेलांब पल्ल्याच्या आव्हानात्मक सायकल प्रवासातून खेळाडूंचा साहस विकसीत करणेसायकल शर्यत व मनोरंजनगुडघे दुखी व पाठीच्या कण्याचे आजारातून मूक्तता अशा विविधांगी दृष्टिकोनातून सायकलींग ची गरज व जागरुकता जनतेत रुजवण्यिासाठी फिटनेस का डोज अर्धा तास रोज म्हणत  सायकल  रॅली काढण्यात आली.

०००००

Monday, 3 March 2025

आश्रम शाळेतील शिक्षकांची जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील शाळांना भेट



 आश्रम शाळेतील शिक्षकांची जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील शाळांना भेट

चंद्रपूर, दि. 03 मार्च : जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर मार्फत मुल्यमापन, सनियत्रंण व उपयुक्तता तपासणी योजनेच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर  अंतर्गत येणाऱ्या शासकीय /अनुदानित एकलव्य आश्रम शाळेतील शिक्षकांकरीता एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.

आश्रम शाळेतील 41 शिक्षकांना जिल्ह्याबाहेरील उपक्रमशील  शाळा  दाखविण्यात आल्या. यात जिल्हा परिषद डिजीटल प्राथमिक शाळा खराशी (जि. भंडारा) व पीएमश्री जवाहरलाल नेहरु नगर परिषद शाळा गडचिरोली या शाळांना भेटी देण्यात आल्या. सदर शाळांमध्ये विविध नाविण्यपुर्ण उपक्रम घेतले जातात. भेटीदरम्यान शाळेतील विविध उपक्रमांचा शिक्षकांनी अनुभव घेतला. यात दैनिक परीपाठ, डीजीटल अंगणवाडी, बोलके वर्ग व बोलके विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांची स्वयं अध्ययन क्षमता, शिक्षक अध्यापन पद्धती, डिजिटल यंत्राचा प्रत्यक्ष वापर, शाळेचे आनंददायी वातावरण, दप्तरविना शाळा, सुट्टीच्या दिवशीची शाळा, विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड यांचा समावेश होता. 

             सदर शाळा भेटी दरम्यान प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी युवराव चव्हाण, महेश गिरडकर, प्रविण कुळसंगे, सुरेश श्रीरामे हे शिक्षकांसोबत उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता शाळेत विविध शैक्षणिक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक असते. त्या दृष्टिने शिक्षकांना विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची भर मिळावी, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांकरीता व्हावा हा उद्देश समोर ठेवून सदर शाळाभेटीचे आयोजन प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात आले होते. उपक्रमशील शिक्षकच एक गुणवत्तपुर्ण विद्यार्थी तयार करू शकतो. सदर शाळांना भेटी दरम्यान शाळेतील विविध नाविण्यपूर्ण उपक्रम, प्रगत विद्यार्थी, बोलके विद्यार्थी, विविध शैक्षणिक साहित्य, डिजिटल वर्ग यांचा अनुभव शिक्षकांना घेतला.  तेव्हा यांचा उपयोग आश्रम शाळेतील ‍विद्यार्थ्यांकरीता करता येईल व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी यामुळे मदत होईल.

 सदर अभ्यास दौऱ्याकरीता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा  जी.सी. यांचे विशेष आभार मानले.

०००००