मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेचे अर्ज 10 मार्चपर्यंत सादर करा
चंद्रपूर, दि.5 मार्च : अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रीशिप, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना या पाच योजनांचे नविन व नुतनीकरणाच्या अर्जाची महाडीबीटी प्रणालीद्वारे स्वीकृती सुरू झाली आहे.
महाडीबीटी प्रणालीवर ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी केलेली नाही वा मागील वर्षातील अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहे, अशा अर्जदारास त्यांचा अर्ज सादर करण्याबाबत महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी लेखी सूचना निर्गमित कराव्यात. तसेच विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज सादर न केल्यास सदर योजनेच्या लाभापासून अर्जदार वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, याची विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी, अशाही सूचना देण्यात याव्या. तसेच महाविद्यालयाने प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची नोंदणी होईल या दृष्टिने प्रयत्न करावेत.
महाडीबीटी प्रणालीवरील द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाकरिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरणाच्या अर्जाकरिता प्रथम प्राधान्य देऊन सदर अर्ज प्राचार्यांनी निकाली काढावेत. प्रथम वर्षातील ज्या अभ्यासक्रमांचे संबंधित शैक्षणिक यंत्रणा/ विभागामार्फत महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क मंजुर झालेले आहे, अशा द्यमहाविद्यालयांनी नविन अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सर्व दस्ताऐवजांची पडताळणी, अभ्यासक्रम शुल्क, आधार बँक लिंकस्थिती, इत्यादि बाबींची खातरजमा सर्व अर्ज 10 मार्च 20254 पर्यत जिल्हा कार्यालयास तात्काळ पाठवावेत.
महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहिल, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment