जिल्ह्यात एकाच वेळी 30263 लाभार्थ्यांच्या घरकुल जागेचे भूमिपूजन
गरीब, कष्टकरी, ग्रामीण
भागातील ग्रामस्थांना स्वतःच्या घरकुलचे महत्व अनन्यसाधारण असून त्यांना घरकुल
मंजूर झाल्यावर अतिशय आनंद होतो. मात्र त्याचे रूपांतर वास्तविकेत होण्यासाठी
कधीकधी विलंब होतो. हा विलंब टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत 'घरकुल
भूमिपूजन' हा अभिनव उपक्रम राबविला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेची संख्या मोठी असून
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूरच्या माध्यमातून गरिबांकरिता मोठ्या
प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकूण मंजूर घरकुलांची संख्या 30263
असून या सर्व घरकुलाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यात चिमुर -1825 , मूल-2650, जिवती
- 1545, पोंभुर्णा -1225 सावली -2096, बल्लारपूर -1140, नागभीड-2358, गोंडपिपरी
-2785, चंद्रपूर-1089, राजुरा-2699, वरोरा-1958, भद्रावती
- 1968, सिंदेवाही-2437, कोरपणा-1923, ब्रम्हपूरी
-2565 अशी घरकुलांची संख्या आहे.
मुख्यमंत्री यांच्या 100
दिवसीय कृती आराखड्या अंतर्गत घरकुल
योजनेतील लाभार्थीचे स्वतःचे घर लवकर पूर्ण व्हावे, याकरिता
प्राधान्याने उपाययोजना आखून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या
मार्गदर्शनात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -2
अंतर्गत मंजूर घरकुले लवकर पूर्ण करून देण्याकरीता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत
स्तरावर 24 मार्च रोजी एकाच वेळी मंजूर घरकुलाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले. सर्वच तालुक्यातील पात्र
लाभयार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व तालुका स्तरावर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक
करण्यात आली. यात जिल्हा परिषदेचे विभाग
प्रमुख मीना साळुंखे, नूतन सावंत, अतुलकुमार
गायकवाड, हर्ष बोहरे, मनोहर
वाकडे, गटविकास अधिकारी, पालक अधिकारी तसेच सर्व कर्मचारी व गावातील
प्रमुख मान्यवर लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.
ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर घरकुल
लाभार्थ्यांच्या हस्ते भूमिपूजन करून घरकुल बांधकामास सुरवात करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन
यांनी चंद्रपूर तालुक्यातील जुनोना येथे
उपस्थित राहून घरकुल लाभार्थीचे परिवारासह घरकुलचे भूमिपूजन केले. या उपक्रमात
सर्व कर्मचारी व गावातील प्रमुख मान्यवर लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. या
"घरकुल भूमिपूजन " कार्यक्रममुळे ग्रामीण भागात अतिशय आनंदाचे वातावरण
निर्माण झाले. तसेच सर्व स्तरावर या
उपक्रमाचे कौतुक होत आहे. सदर मंजूर घरे लवकरच पूर्ण करून लाभार्थ्यांना स्वतःचे
पक्के घर बांधून देण्यास प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे
विवेक जॉन्सन म्हणाले.
No comments:
Post a Comment