Search This Blog

Tuesday, 18 March 2025

पीएम किसानच्या फसव्या लिंकपासून सावधान

 

पीएम किसानच्या फसव्या लिंकपासून सावधान

Ø कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर,  दि. 18 मार्च : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.  या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप (एपीके फाईल) या मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम चोरटे परस्पर काढून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या पीएम किसान ॲप्लिकेशनपासून सावध राहावे.

शेतकऱ्यांनी मोबाइलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप (एपीके फाईल)  या संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास   त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.

चोरट्यांनी एपीके (ॲड्राईड पॅकेज किट)  लिंक पाठवत ती उघडणाऱ्यांच्या बॅंक खात्यावरील रक्कम  लंपास करण्यास सुरुवात  केली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशी फसवी लिंक ओळखून त्यापासून सावध राहावे. मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके( PM Kisan List APK)   किंवा  पीएम किसान एपीके’ (PM Kisan  APK) अशा लिंक येत आहेत. चोरटे अशा लिंक मुद्दामहून शेतकऱ्यांच्या विविध  ग्रुपवर पाठवत आहेत. परिणामी फोन हॅकिंगमाहितीची आणि आर्थिक फसवणूक करण्याचे आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी दक्ष रहावे, असे आवाहन चंद्रपुरचे तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment