Search This Blog

Tuesday, 25 March 2025

दिव्यांग व 65 वर्षांवरील नागरिकांना मिळणार सहायक उपकरण

 

दिव्यांग व 65 वर्षांवरील नागरिकांना मिळणार सहायक उपकरण

Ø 27, 28 व 29 मार्च रोजी प्राथमिक तपासणी शिबीर

चंद्रपूर, दि. 25 मार्च : भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या माध्यमातून वरोरा व राजुरा येथे दिव्यांग व 65 वर्षांवरील व्यक्तिंचे प्राथमिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सीएमपीडीआय यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून दिव्यांग व 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींसाठी लागणारे सहाय्यक उपकरण वितरण करण्याकरिता 2728 मार्च 2025 रोजी महारोगी सेवा समिती परिसर, आनंदवन, ता. वरोरा येथे तर 29 मार्च रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व ज्यु. कॉलेज राजुरा येथे सकाळी 11 ते ‍दुपारी 4 या वेळेत प्राथमिक तपासणी शिबीर होणार आहे. सदर शिबिरामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तिंनी नमुद कागदपत्रे घेवून सहभागी व्हावे.

लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत : 1.  किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असलेले यु.डी.आय.डी. दिव्यांग प्रमाणपत्र. 2.  आधार कार्ड (जन्म तारीख नोंद असलेले) 3.  उत्पन्न दाखला (सरपंच/ तलाठी/ तहसिलदार यांनी दिलेला) 4.  राशन कार्ड 5.  मोबाईल क्रमांक

००००००

No comments:

Post a Comment