महाकाली यात्रा
महोत्सवाच्या परिसराची जिल्हाधिका-यांकडून पाहणी
Ø पूर्वतयारीबाबत संबंधित यंत्रणेचा आढावा
चंद्रपूर, दि.24 मार्च :
चंद्रपूर शहरात पुढील आठवड्यापासून सुरू होणा-या माता महाकाली यात्रा परिसराची
पाहणी करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विविध विभागाच्या पूर्वतयारीचा
आढावा घेतला.
महाकाली मंदीर
परिसरात नुकत्याच झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय
अधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपील पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, तहसीलदार विजय पवार, प्रादेशिक परिवहन
अधिकारी किरण मोरे, पोलिस निरीक्षक (वाहतूक) प्रवीणकुमार पाटील, योगेश पारधी
(विशेष शाखा), महाकाली मंदीर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे, आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी सलीम शेख उपस्थित होते.
चंद्रपूरचे
आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. सदर
यात्रा 15 एप्रिलपर्यंत राहणार असून 11 ते 15 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात
भाविकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांचा आढावा घेतांना
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरीता चंद्रपुरात परराज्यातून
तसेच विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. बाहेरून येणा-या बसेसची
व्यवस्था तसेच प्रशासनाने नियोजित केलेल्या जागेवरच पार्किंग व्यवस्था असली
पाहिजे. भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सोयीसुविधा जसे पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट,
दैनंदिन स्वच्छता व इतर अनुषंगीक बाबी मनपाने उपलब्ध करून द्याव्यात. नियमित
स्वच्छतेसाठी मनपाने अधिकारी – कर्मचा-यांच्या ड्युटी लावाव्यात.
नदीवर आंघोळ
करतांना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने शोध व बचाव पथक तैनात ठेवावे. यात्रा
कालावधीत हवामानाची माहिती अवगत करावी तसेच जिल्हा नियंत्रण कक्षासोबत
(07172-250077) समन्वय ठेवावा. महावितरणने यात्रा परिसरात अखंडीत वीज पुरवठा सुरू
राहील, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेसह 24 बाय 7 आरोग्य पथक
तैनात ठेवावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी सार्वजनिक
बांधकाम विभाग, चंद्रपूर महानगर पालिका, राज्य परिवहन मंडळ, आरोग्य विभाग, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलिस विभाग आदींचा आढावा घेतला. तसेच मंदीर
परिसरातील भाविकांसाठी असलेला दर्शनाचा मार्ग, वाहनांची पार्किंग, नदी काठावरील
आंघोळीचे ठिकाण, परिसरात लागणा-या दुकानांची जागा आदींची पाहणी केली.
०००००
No comments:
Post a Comment