ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 28 मार्च : बॅंक ऑफ
इंडिया ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे बाबुपेठ येथील जुने डी.एड.
कॉलेज जवळ 2 एप्रिल पासून 30 दिवसांकरीता ग्रामिण भागातील युवकांसाठी घरगुती वायरिंग आणि उपकरणे हे निवासी मोफत प्रशिक्षण
तसेच दि. 3 एप्रिल पासून 10 दिवसाकरिता मशरुमची शेती या निवासी मोफत प्रशिक्षणाचे
आयोजन करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेणा-यांचे वय 18 ते 45 असावे. तसेच या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी
व्यक्तींना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी
उमेदवारांनी 11 ते 5 वाजेपर्यंत बॅंक ऑफ
इंडिया ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील अनुप
कासवटे (मो.क्र. 8421009602) आणि अक्षय लांजेकर (मो. क्र. 9021913751) यांच्याशी
संपर्क करावा व आपले नाव नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरसेटीचे
संचालक यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment