शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिका-यांचा संवाद
Ø सिदूर येथे भेट व पाहणी
चंद्रपूर, दि. 20 मार्च : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशान, तसेच गावातील शाळा व अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर तालुक्यातील सिदूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, संवर्ग विकास अधिकारी संगिता भांगरे, उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) गीता चौधरी, केंद्र प्रमुख अतुल पोहाणे, निखील तांबोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मासीरकर, सरपंच मंजुषा मत्ते, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना माहुरकर यांच्यासह राजानंद दुधे, संभशीव गावंडे, अविनाश जुमडे तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.
या प्रसंगी शालेय मंत्रीमंडळातील मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री उन्नती शेलवटे व संबोधी मोडक यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिका-यांचे स्वागत केले. तसेच शालेय स्काऊट गाईड पथकानेसुद्धा सलामी दिली. शाळेतील सर्व वर्गाची पाहणी करून जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. इयत्ता 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी, मराठी यांचे वाचन, मुलभूत क्रिया याबद्दल सुद्धा विचारण्यात आले. वर्गातील शैक्षणिक साहित्य हाताळणी विद्यार्थीनी खूप सुरेख केली. शाळेत चालणारे विविध उपक्रम उदा. डिजिटल वर्गखोली, शालेय बचत बँक, गांडूळ खत, ज्ञानपुष्प विज्ञान कोडे व अन्य उपक्रम याविषयी अविनाश जुमडे यांनी माहिती दिली.
इयत्ता 8 वी तील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांसोबत चर्चा करतांना स्पर्धा परिक्षा व माहिती विचारली. यावेळी जिल्हाधिका-यांनी शालेय परिसर, विद्यार्थी गुणवत्ता, शालेय उपक्रम यांची प्रशंसा करून शालेय मैदानासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शालेय परिसरात असलेल्या अंगणवाडीत सुद्धा जिल्हाधिका-यांनी भेट देऊन मुलांसोबत संवाद साधला.
००००००
No comments:
Post a Comment