अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा
आढावा
चंद्रपूर, दि. 28 मार्च : जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे (प्राथ.) आदी उपस्थित होते.
अल्पसंख्याक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी
जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्यांक शाळांची बैठक घ्यावी, असे सांगून ललित गांधी
म्हणाले, सरकारतर्फे निधीची तरतूद करण्यात येते, मात्र शाळांचे प्रस्तावच प्राप्त
होत नाही. निधीसाठी शाळांचे प्रस्ताव येणे आवश्यक आहे. यात जैन शाळांचासुध्दा
समावेश असावा. भद्रावती येथे प्राचीन जैन तीर्थक्षेत्र आहे. चंद्रपूर शहरामध्ये
मनपाने जैन कम्युनिटी सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जिल्हाधिका-यांच्या
अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक कल्याण समितीची स्थापना करावी.
येत्या 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती
आहे. या दिवशी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश असतात. त्याची जिल्हा प्रशासनाने
प्रभावी अंमलबजावणी करून संबंधित यंत्रणेला याबाबत निर्देश द्यावे. यावेळी त्यांनी
प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी योजना आणि मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेत अल्पसंख्यांक
समाजाच्या सद्यस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
सादरीकरणात जिल्हा नियेाजन अधिकारी संजय कडू
यांनी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत संविधान भवन तयार करण्याबाबतची
सद्यस्थिती, निंबाळा येथे नवीन उपकेंद्र बांधकाम करणे, डॉ. झाकिर हुसेन मदरसा
आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणा-या मुलींकरीता
वसतीगृहे, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र
विकास कार्यक्रम आदींची माहिती दिली.
००००००
No comments:
Post a Comment