जिल्हयात किटकजन्य आजाराची
चित्ररथ व्दारे जनजागृती
चंद्रपूर, दि. 24 मार्च : आरोग्य विभाग, हिवताप विभाग व
फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रकल्प यांच्या संयुक्त सहकार्याने जिवती, कोरपना, राजुरा, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी व
गोंडपिपरी या 8 तालुक्यात हिवतापासाठी अतिसंवेदनशील असलेल्या 100 गावात किटकजन्य
आजार तसेच हिवताप व डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
किटकजन्य जनजागृती
चित्ररथाचे उदघाटन अति. कार्यकारी अधिकारी
मीना साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे तसेच एम्बेड
प्रकल्पाचे क्षेत्र समन्वयक गोपाल
पोर्लावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. तसेच सदर चित्ररथ
गावोगावी जनजागृती करण्यासाठी रवाना करण्यात आले.
चंद्रपुर जिल्हयातील
जिवती, कोरपना, राजुरा, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी व गोंडपिपरी या तालुक्यातील किटकजन्य
आजाराकरिता अतिसंवेदनशिल क्षेत्रामध्ये हिवताप व डेंग्युच्या निर्मुलनासाठी एम्बेड
प्रकल्पाच्या स्वयंसेवी कार्यकर्तामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम घेतले जात
असल्याची माहिती फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रकल्पाचे क्षेत्र समन्वयक गोपाल
पोर्लावार यांनी दिली. त्याचाच एक भाग म्हणून चित्ररथाच्या माध्यमातून
अतिसंवेदनशील गावातून किटकजन्य आजार, हिवताप व डेंग्यु बाबतची जनजागृती करून जनमानसात
प्रतिबंधात्मक सवयी व आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.
आठवडयातून एकदा सर्वांनी कोरडा दिवस पाळावा, घरासमोर पाणी
साचू देऊ नये, घर व परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याचे टाके किंवा पाणी
साठवणुकीचे भांडे स्वच्छ ठेवावे, टाके उघडे ठेऊ नये, यासंकाळी घराचे दरवाजे
तसेच खिडक्या बंद करून ठेवावेत, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झाडांच्या कुंडयात पाणी
साचु देऊ नये, घरातील फ्रिजच्या वॉटर पॅन मध्ये जमा झालेले पाणी फेकावे
तसेच कुलरमधील पाणी वारंवार बदलावे. कारण डासांच्या बहुतेक अळया याच ठिकाणी आढळुन
येतात. आरोग्य विभागाकडून सुध्दा नियमित उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांना
खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावे, पाण्याचे साठे उघडे ठेऊ
नये याबाबत सुध्दा जनजागृती करण्यात येणार आहे.
याप्रसंगी फॅमिली हेल्थ
इंडिया एम्बेड प्रकल्पातील स्वयंसेवक तसेच हिवताप विभागाचे आरोग्य निरिक्षक सुनिल
मेघावत व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment