Search This Blog

Monday, 17 March 2025

नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 

नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चंद्रपूर,  दि. 17 मार्च : नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट अर्थात नीट परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसीयांनी सोमवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्यायावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारकेंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य तथा नीट परीक्षा जिल्हा समन्वयक अनिल घोलपेशिक्षण अधिकारी कार्यालयाचे श्रीयेळणे तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात मे 2025 रोजी 12 परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहेपरीक्षा केंद्र असलेल्या सर्व परिसराची तसेच तेथे पुरविण्यात येणा-या सर्व सोयीसुविधांची पाहणी करावीपरीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार होऊ नयेयासाठी सुरक्षेसह इतर अनुषंगीक बाबींची पुर्तता करावीअशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्याचंद्रपूर जिल्ह्यात एकूण 5124 विद्यार्थी नीटच्या परिक्षेला बसले आहेत.

00000

No comments:

Post a Comment