Search This Blog

Friday, 7 March 2025

पीएम अवार्डकरिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड

 

पीएम अवार्डकरिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड

Ø आकांक्षित तालुका कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 7 मार्च : देशातील सर्वात मागासलेल्या भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत एकूण पाच थीम व नऊ सेक्टर दिले आहेत. या नऊ सेक्टरमध्ये जिवती तालुक्याची उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने आकांक्षित तालुका कॅटेगिरीमध्ये पीएम अवार्ड करिता जिवती तालुक्याची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्यपोषणशिक्षणस्वच्छताकृषी आणि संबंधित सेवापेयजल आणि स्वच्छताआर्थिक समावेशनमूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास आदींचा समावेश आहे. भारत सरकारने 2024 च्या सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार योजनेला मान्यता दिली आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कारांची रचना देशभरातील नागरी सेवकांनी केलेल्या अनुकरणीय कार्याची दखल घेण्यासाठीओळखण्यासाठी आणि त्यांना बक्षीस देण्यासाठी करण्यात आली आहे. 

या अनुषंगाने प्राधान्य क्षेत्रातील कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा समग्र विकास या श्रेणीअंतर्गत पाच पुरस्कार प्रदान केले जातील. आकांक्षित तालुका कार्यक्रम या श्रेणीअंतर्गत पाच पुरस्कार तर केंद्रीय मंत्रालये/विभागराज्येजिल्हे यांच्यासाठी नवोपक्रम या श्रेणीअंतर्गत सहा पुरस्कार प्रदान केले जातील.

20 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान पुरस्कार पोर्टल सुरू करण्यात आले. 27 जानेवारी  ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत नोंदणी आणि नामांकन सादर करण्यासाठी हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या अंतर्गत पीएम पुरस्कार पोर्टलवर 1588 नामांकने प्राप्त झाली. यात जिल्ह्यांचा समग्र विकास करीता 437 नामांकने, आकांक्षित तालुका कार्यक्रम करीता 426 नामांकने तर नवोपक्रम अंतर्गत 725 नामांकने प्राप्त झाली. यात आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्याची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

आकांक्षित कार्यक्रम सुरू झाल्यापासून एप्रिल ते जून 2023 च्या आधारावर प्रथम डेल्टा रँकिंग प्रदर्शित करण्यात आली होती. त्यात जिवती तालुक्याचा भारतातून 500 पैकी 290 वा क्रमांक होता. त्यानंतर मागील एका वर्षात सर्व विभागनीय काम केल्यानंतर सहाव्या डेल्टा रँकिंग नुसार जिवती तालुक्याचा क्रमांक संपूर्ण भारतामध्ये 500 पैकी 49 वा आहे. तसेच झोन फोर- पश्चिम विभाग यामध्ये 69 आकांक्षित तालुक्यांपैकी जिवतीचा पाचवा क्रमांक आहे.

०००००००

No comments:

Post a Comment