पालकमंत्री यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
देशाच्या व राज्याच्या
विकासचक्राला गती देणारा अर्थसंकल्प : डॉ. अशोक उईके
चंद्रपूर : ‘विकसीत भारत...
विकसीत महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची हमी
देणारा तसेच देश व राज्याच्या विकासचक्राला अधिक गती देणारा हा अर्थसंकल्प आहे.
यात उद्योग, पायाभुत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक क्षेत्र आदींचे
जाळे अधिक विस्तृत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात
सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारने मांडला आहे.
विशेष म्हणजे जल, जंगल, जमीन आणि प्राचीन
संस्कृतीचे रक्षण करणा-या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात
भरीव वाढ करण्यात आली आहे. गत वर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास विभागाच्या
निधीमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करून यावर्षी 21495 कोटींची तरतूद करण्यात आली
आहे. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण
उन्नतीला चालना मिळणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.
०००००
%20(1).jpeg)
No comments:
Post a Comment