Search This Blog

Friday, 28 March 2025

ॲग्रीगेटर व प्लॅटफॅार्म वर्कर नोंदणी

ॲग्रीगेटर व प्लॅटफॅार्म वर्कर नोंदणी

चंद्रपूर, दि. 28 मार्च :  कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी देशातील असंघटीत /  स्थलांतरित कामगारांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) देऊन त्यांची नोंदणी करण्यासाठी ई -श्रम पोर्टल सुरु केले आहे. यामुळे ई श्रम पोर्टलवर नोंदीत झालेल्या असंघटीत /स्थलांतरित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजना एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे.

         देशातील लाखो कर्मचारी प्लॅटफॅार्म अर्थव्यवस्थेत काम करत आहेत, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई- श्रम पोर्टलवर प्लॅटफॅार्म  कामगारांची व गिग कामगारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तशी नोंदणीची  सुविधा ई-श्रम पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्लॅटफॅार्म कामगाराने ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांचा विविध कल्याणकारी योजनेत समावेश होईल.               

ॲग्रीगेटर सेवांमध्ये राईड शेअरिंग सेवा, अन्न आणि किराणा माल वितरण  सेवा,  लॉजिस्टिक सेवा, वस्तु आणि /किंवा सेवांच्या घाऊक /किरकोळ विक्रीसाठी ई -मार्केट ठिकाण,  व्यावसायिक सेवा प्रदाता, आरोग्यसेवा,  प्रवास आणि आदरातिथ्य, सामग्री आणि मिडिया सेवा, इतर कोणतीही वस्तु आणि सेवा प्रदाता प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.

           वर नमूद क्षेत्रातील  एग्रीगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर (www.eshram.gov.in) नोंदणी  (OnBoard) करण्याच्या सूचना विकास आयुक्त (असंघटीत कामगार) यांनी दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्हयात वर नमूद कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या एग्रीगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी 31 मार्च 2025 पूर्वी करावी,  असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment