12 मार्च रोजी शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळावा
Ø सिकलसेल व दंत तपासणी शिबिराचेही आयोजन
चंद्रपूर, दि. 11 मार्च : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर द्वारे 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन शहीद भूमी स्मारक, जिल्हा कारागृह परिसर, गिरनार चौक चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
कार्यक्रमाच्या स्थळी सिकलसेल व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबीर हे सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे कोणताही व्यक्ती या शिबिरात तपासणी करू शकतो. तसेच 09 ऑगस्ट 2024 रोजी आदिवासी दिनानिमित्त आयोजित झाँकी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेल्या प्रकल्पातील शासकीय, अनुदानित, नामांकित शाळेतील विद्यार्थी व शिक्षक आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सोबतच आदिवासी लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वसतीसुधार योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.
००००००
No comments:
Post a Comment