विकासकामांच्या पाहणी करिता जिल्हाधिकारी 'ऑनफिल्ड'
Ø सावली
तालुक्यातील विविध गावांना भेटी
चंद्रपूर, दि. 22 मार्च : 100 दिवस कृती
आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आठवडयातून किमान दोन दिवस क्षेत्रीय
भेटीदरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची
पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा
जी.सी. यांनी सावली तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विकास कामांची पाहणी
केली.
यावेळी
जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सावली तालुक्यातील
मौजा चकपिरंजी येथील गांडूळ खत (सेंद्रिय शेती) युनिट, साई श्रेया
शेतकरी उत्पादन कंपनी, श्री नाविण्यपुर्ण प्रकल्पास भेट दिली. वन्यप्राण्यांच्या
त्रासामुळे शेती करतांना नुकसान होत असल्याने झटका मशीन यंत्र देऊन उपाययोजना
करण्याबाबत शेतकऱ्यांच्या मागणीस
जिल्हाधिकारी यांनी पुढील वर्षीच्या नियोजनामध्ये विशेष प्राधान्य देण्यात
येईल, असे नमूद केले.
मौजा हिरापूर
येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत नाविण्यपुर्ण ड्रॅगन फुड लागवड अंतर्गत कृतीशील व
प्रायोगिक तत्वावर शेती तयार करण्याच्या सुचना तालूका कृषी अधिकारी यांना दिल्या.
तसेच मौजा व्याहाड खुर्द ते गांगलवाडी 45 कि.मी. लांबीचा राज्य महामार्ग रस्त्याचे
बांधकामाची पाहणी केली. कामाचा दर्जा व गुणवत्तापुर्वक रस्त्याचे बांधकाम
करण्याच्या सुचना दिल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पाथरी येथे मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांणद रस्ते पाहणी
करून नविन पांदन रस्त्याची कामे व रस्त्याची गुणवत्ता राखली जाईल. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजने अंतर्गत मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पांणद रस्त्यांच्या कामांना अधिक
प्राधान्य द्यावे. जास्तीत जास्त
शेतकऱ्यांना स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी करुन घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी
श्री. गौडा यांनी संबंधीत यंत्रणांना दिल्या.
यावेळी उपविभागीय
अधिकारी अजय चरडे, तहसिलदार प्रांजली चिरडे, गट विकास अधिकारी योगेश
गाडे, तालुका कृषी अधिकारी श्री. राऊत, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, नायब तहसिलदार
चांदेकर, मडावी, कांबळे तसेच प्रगतशिल शेतकरी अनिल मुर्लीधर स्वामी व अशोक गणपत चन्नुरवार, पाथरीचे सरपंच
श्री. तुम्मे, रोजगार सेवक, मंडळ अधिकारी, तलाठी गावातील नागरीक
उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment