Search This Blog

Monday, 17 March 2025

आरटीओच्या वायुवेग पथकाद्वारे 13 टिप्पर वाहनांवर कारवाई


 

आरटीओच्या वायुवेग पथकाद्वारे 13 टिप्पर वाहनांवर कारवाई

चंद्रपूरदि. 17 मार्च :  चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  वायुवेगपथकाने अचानक भेट देऊन प्रकल्पाच्या मागील भागातील सायवान परिसरात कडक तपासणी करून 13 टिप्पर वाहनांवर कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेल्या सहा वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकाव करून ठेवण्यात आले तर उर्वरित वाहनांना चालान देण्यात आले आहे.  केंद्रीय मोटार वाहन  नियम 138 नुसारएकरुप नसलेला माल  हा व्यवस्थितरित्या ताडपत्रीने आच्छादित करून किंवा बंद कंटेनरद्वारा वाहतूक करणे अत्यावश्यक असतांना सदर वाहनातील राखेवर  फक्त ग्रीननेटचे आवरण होतेराखेला व्यवस्थितरित्या आच्छादित न करता वाहतुक  करणाऱ्या वाहनांवार मोटार वाहन कायाद्यातर्गंत कडक कारवाई करण्यात येते. 

तसेच याबाबत सीटीपीएसच्या वरिष्ठ  अधिका-यांशी भेट घेऊन सदर राख आच्छादित न करता वाहतुक केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबतचे सांगण्यात आलेसार्वजनिक परिसरात वाहतुक न करता सीटीपीएस स्तरावर प्रकल्पातर्गंतच्या जागेवर राखेची विल्हेवाट लावावीअसेही निर्देश देण्यात आलेचंद्रपूर थर्मल पॉवर  स्टेशन  सीटीपीएस येथून उत्पन्न होणारी राख एएसएच सुरक्षित आणि नियमानुसार होण्यासाठी  आरटीओ  कार्यालयाकडुन सीटीपीएस प्रवेशद्वारावर निरीक्षण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईलअसे आरटीओ विभागाकडून  स्पष्ट करण्यात आले आहे.

              सदर कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निदीक्षक दिपक काळे,  विलास ठेंगणेअनुराग सालनकरनिखिल गायकवाडसुरज मुन यांच्यामार्फत करण्यात आली.

०००००

No comments:

Post a Comment