कारागृहातील बंदीवानांसाठी सांस्कृतिक
कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 25
मार्च : सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबईतर्फे 'जीवन गाणे गातच जावे', हा सांस्कृतिक
कार्यक्रम मंगळवारी चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे पार पडला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कारागृह अधिक्षक अनुप कुमरे तर प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास
विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, कौशल्य
विकास अधिकारी रोशन गबाले, कारागृहाचे वरिष्ठ निरीक्षक नागेश कांबळे, सतीश सोनवणे,
कमलाकर मिरासे, ॲङ चैताली बोरकुटे – कटलावार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना
कारागृह अधिक्षक श्री. कुमरे म्हणाले, बंदिवानांना कारागृहात आनंदी वातावरणात
जगण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहे. यात सांस्कृतिक
कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातीलही कलागुणांना विकसीत करणे, चांगले वर्तन
ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदींचा समावेश आहे. सहायक आयुक्त श्री. येरमे
म्हणाले, आनंद हा आपल्यातून निर्माण झाला पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय, याची
पारख करून आपण ते स्वीकारावे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्यास
नक्कीच मदत मिळते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. येसनकर यांनीसुध्दा
मार्गदर्शन केले.
यावेळी
बंदीवासांसाठी योग नृत्य परिवारातर्फे सुरेश घोडके आणि समूह यांनी अधिवासांना योगा
शिकवला. गुन्हेगाराची सायकॉलॉजी या
विषयावर धनंजय तावडे यांनी मार्गदर्शन केले. गुन्हेगारीचे दुष्परिणाम व गुन्हे
सोडल्यावरचे जीवन या विषयावर ऍडव्होकेट चैताली बोरकुटे-कटलावार यांनी मार्गदर्शन
केले. कला श्री आर्ट फाउंडेशनच्या मुलींनी व शिक्षिका स्नेहा पारवेकर यांनी कथक व
देशभक्तीपर नृत्य सादर केले. त्यानंतर बंदीवासांसाठी संस्कृती देशभक्ती प्रबोधनपर
स्वरसुगम संगीत ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. त्यात देशभक्तीपर थोर महापुरुषांवर
व संस्कृती हा विषय घेऊन अतिशय दर्जेदार गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी तेजराज चिकटवार, वैशाख रामटेके, रोहित रामटेके, प्रदीप यमनूरवार
व सुशील सहारे यांनी सहकार्य केले.
००००००
No comments:
Post a Comment