पंतप्रधान इंटर्नशिप योजनेकरीता 31 मार्च पर्यंत नोंदणी
चंद्रपूर, दि. 25 मार्च : पंतप्रधान
रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत
पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेची
उमेदवारांनी नोंदणी करण्याचा कालावधी 31
मार्च 2025 पर्यंत आहे. नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in. या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या
योजनेअंतर्गत देशातील टॉप 500
कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कॉर्पोरेट
व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी
इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक
इंटर्नसाठी वार्षिक 66 हजार रुपये देण्यात येणार आहे. दरमहा 5हजार रुपये आर्थिक सहाय्य
दिले जाणार असून कंपनी त्यांच्या सीएसआर निधीतून 500 रुपये व केंद्र सरकार 4500
रुपये देणार आहे. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल.
भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा
योजनेअंतर्गत या शिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे
वय 21 ते 24 वर्ष असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
8 लाखापेक्षा कमी, पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी
ही संधी आहे.
चंद्रपूर
जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा
कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment