बांबू हस्तकलेच्या माध्यमातून मिळणार घुग्घुस येथील महिलांना रोजगार
चंद्रपूर, दि. 7 मार्च : बांबू हस्तकलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्लीतर्फे घुग्घुस येथील 40 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. खाणबाधित क्षेत्रातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी घुग्घुस येथे 15 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच पार पडला.
अप्पर प्रधानमुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. एस. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे संचालक अशोक खडसे, यांच्या मार्गदर्शनात आयोजित या प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमप्रसंगी बीआरटीसी केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी. मल्लेलवार, वनपाल एस. एस.लाटकर,
हस्तकला निदेशक किशोर गायकवाड, प्रशिक्षक सुनिता मोकासे, काजल निमकर, लक्ष्मी मिटपल्लीवार, प्रियंका पाल आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात बी.आर.टी.सी. तर्फे महिलांसाठी वन अकादमी येथील बी.आर.टी.सी.कार्यशाळेतऔद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महिलांना बांबूचा मूल्यवर्धित उपयोग, संवर्धन व उत्पादन प्रक्रिया, इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना बांबू क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मनोगत प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केले. सदर प्रशिक्षणाचे तांत्रिक मार्गदर्शन बी.आर.टी.सी. पर्यवेक्षिका योगिता साठवणे, डिझायनर अंतिक मल्लिक, संतोष बजाईत यांनी केले.
००००००
No comments:
Post a Comment