Search This Blog

Friday, 7 March 2025

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींकरिता गट चर्चा

 

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींकरिता गट चर्चा

चंद्रपूर, दि. 7 मार्च : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींकरिता गट चर्चा आयोजित करण्यात आली होती.

या चर्चेमध्ये तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना व्यसन सोडण्याकरिता समुपदेशन करण्यात आले. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम, व्यसन सोडण्याकरिता युक्त्या याबाबत व्यक्तींशी हितगुज करून डॉ.संदीप पिपरे यांनी मार्गदर्शन व औषधोपचार केले. ज्या व्यक्तींनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन अगोदरपासून सोडलेले आहे, अशा व्यक्तींचे अनुभव कथन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. प्राजक्ता खेळकर उपस्थित होत्या. तसेच सदर चर्चेमध्ये एकूण 25 ते 30 स्त्री व पुरुष यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तुषार रायपुरे यांनी केले. आयोजन मित्रांजय निरंजने (समुपदेशक) यांनी केले.

००००००

No comments:

Post a Comment