सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरवगाथा कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 6 मार्च : सांस्कृतिक कार्य विभाग अनेक महापुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करून त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविणच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात मुंबईचे संचालक विभिषण चवरे यांच्या नियोजनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरवगाथा या कार्यक्रमाचे आयोजन एफ. इ. एस. महिला महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास विजय मोगरे, प्राचार्य राजेश चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी शाहीर सुरेश जाधव व त्यांच्या संचानी उत्तम कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment