त्रृटी असलेल्या अर्जाची त्वरीत पुर्तता करण्याचे आवाहन
Ø डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
चंद्रपूर, दि. 5 मार्च : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या, तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर 15 जानेवारी 2025 पर्यंत स्विकारण्यात आले आहेत. सदर अर्जाची छाननी केले असता अनेक अर्जामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्रुटी पुर्ततेकरीता सदर अर्ज विद्यार्थी लॉगीनला Revert/Send Back करण्यात आले आहे. विद्यार्थी लॉगीनला दिसत असलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करून विद्यार्थ्यांने आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने तात्काळ परत सबमीट करणे आवश्यक आहे. तसेच अर्जाची प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. ऑनलाईन अर्जासोबत सादर करण्यात येत असलेले सर्व कागदपत्रे हे स्पष्ट दिसणारे असावेत. तसेच ऑफलाईन कागदपत्रे हे विद्यार्थ्यांने स्व:साक्षांकीत (Self Attestd) असावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment