Search This Blog

Monday, 17 March 2025

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 800 लाभार्थी जाणार अयोध्येला


 मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 800 लाभार्थी जाणार अयोध्येला

Ø 19 ते 23 मार्च या कालावधीत यात्रेचे नियोजन

चंद्रपूरदि. 17 मार्च :  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 800  लाभार्थी श्रीराम मंदिर (अयोध्याकरिता पात्र  करण्यात आले असून सदर यात्रा 19 ते 23 मार्च या कालावधीत  पार पडणार आहे.

19 मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानाकावरुन यात्रेकरूंना घेऊन रेल्वे  जाणार असून 20 मार्च रोजी श्रीराम मंदीर अयोध्या येथे पाहोचणार आहे.  21 मार्च  रोजी सांयकाळी सदर ट्रेन अयोध्या रेल्वे स्थानकावरुन निघून 23 मार्च रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहेजिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण चंद्रपूर येथे उपलब्ध आहेलाभार्थ्यांनी संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावीअसे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment