Search This Blog

Wednesday, 7 January 2026

नागभीड ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट






नागभीड ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Ø सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी

चंद्रपूरदि. 07 : नागभीड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयास आज जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थापनाचा आढावा घेतला व संबंधितांना सूचना दिल्यारुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागभीड येथे सुरू असलेल्या 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी केलीतसेच सार्वजनिक विश्रामगृह इमारत बांधकाम आणि तहसील कार्यालय नागभीडच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामस्थळास भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतलासंबंधित कार्यकारी अभियंता व कंत्राटदारांना इमारतींचे बांधकाम गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

तसेच झुडपी जंगल निर्वाणीकरण प्रस्तावाच्या अनुषंगाने नागभीड येथील स्मशानभूमी गट क्रमांक 127/1 व कब्रस्थान गट क्रमांक 71 येथील जागांची पाहणी करण्यात आलीयानंतर तहसील कार्यालयास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनाशी संबंधित विविध कामांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटीलसार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जया कन्नाकेप्रभारी तहसीलदार उमेश कावळेग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉरवी गावंडेतालुका आरोग्य अधिकारी डॉअभिजीत बनपूरकरपोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटेनगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुखउपविभागीय अभियंता गणेश येलेकरमंडळ अधिकारी शंकर खरुले तसेच ग्राम महसूल अधिकारी नितिन बुच्चे आदी उपस्थित होते.

००००००


भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

चंद्रपूर,दि. 07 : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे 19 जानेवारी  ते एप्रिल 2026 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेसदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवासभोजनआणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 14 जानेवारी 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावेमुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअरपुणे (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६६कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्याप्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावेसदर वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधिचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावाउमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेकरीता ऑनलाईद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253, 2451032 किंवा व्हॅाटसअप क्र. 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठीअसून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

ॲक्ट्रोसिटी प्रकरणातील वारसांना मिळणार जमीन

 

ॲक्ट्रोसिटी प्रकरणातील वारसांना मिळणार जमीन

Ø दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेंतर्गत जमीन खरेदीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 07 : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तींवर जातीच्या कारणांवरून होणाऱ्या अत्याचारास पायबंद बसावाया हेतूने केंद्र शासनाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधअधिनियम, 1989 लागू केला आहेसुधारीत नियम 2016 मधील तरतूदीनुसार अधिनियमांतर्गत दाखल खून वा मृत्युच्या प्रकरणातील पिडीतास / कुटुंबास अर्थसहाय्य देण्यात येते व पुनर्वसन करण्यात येते.

तसेच अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकाचे सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत सुधारणा करण्यात आलेली आहेया योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची आहे.

तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडुन शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडुन सन 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहेजिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज सादर करावेतजमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करुन जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल,

आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव नमुना आठपरिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्रअर्जदाराच्या कुटुंबातील सख्खे भाऊपत्नीमुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्रविक्रीच्या शेतजमीनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल,

शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाहीजमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावेसदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावेअसे आवाहन सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

Tuesday, 6 January 2026

नायलॉन मांजा विक्री व वापरणा-यांविरोधात सक्त कारवाई करा


 नायलॉन मांजा विक्री व वापरणा-यांविरोधात सक्त कारवाई करा

Ø जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश

चंद्रपूरदि. 06 : दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा काही जणांचा मृत्यु होतोयाला सर्वस्वी जबाबदार नायलॉन मांजा विक्री करणारे आणि ते वापरणारे आहेतत्यामुळे अशा लोकांविरुध्द सक्त कारवाई करावीअसे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होतेयावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागरनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार विजय पवारमनपा उपायुक्त श्रीचिद्रावारदूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारीतहसीलदार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेनायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून त्याच्या सर्रास वापरामुळे दरवर्षी अनेक नागरिक गंभीर जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. यासाठी नायलॉन मांजा वापरणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते जबाबदार आहे. नायलॉन मांजाचा वापर अतिशय धोकादायक आहेअशा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई करावीत्यासाठी संयुक्त पथके तयार करावीबाजारात किंवा विक्री होत असलेल्या भागात नियमित गस्त घालावीप्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त कारवाई करणे अपेक्षित आहेकेलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावाअशा सुचना त्यांनी दिल्या.

००००००

जिल्ह्यात 15 जाने. ते 7 फेब्रु. दरम्यान सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान

 


जिल्ह्यात 15 जानेते फेब्रुदरम्यान सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान

Ø तपासणी व जनजागृती मोहीम

चंद्रपूरदि. 05 : जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहेसार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार या अभियानासाठी जिल्हास्तरावर व्यापक पूर्वतयारी व नियोजन पूर्ण करण्यात आले आहेसिकलसेल आजाराचा प्रतिबंध व नियंत्रण राखण्यासाठी या कालावधीत विशेष जनजागृतीतपासणी व समुपदेशन मोहीम राबविण्यात येणार आहे.

40 वर्षापर्यंतच्या वयोगटातील सर्व नागरिकांची सिकलसेल तपासणी रुग्ण व वाहकाची नोंदणी आवश्यकतेनुसार HPLC/इलेक्ट्रोफोरेसीस चाचण्या तसेच रुग्णांना उपचार व समुपदेशन देण्यात येणार आहेभावी पिढीतील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाहपूर्व व प्रसूती पूर्व समुपदेशन सत्राचे आयोजन ही करण्यात येणार आहेही मोहीम अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयेग्रामीण रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्रेउपकेंद्र मध्ये आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेतजनजागृतीसाठी पोस्टरपत्रकेसोशल मिडियागृहभेटीआदि माध्यमांचा वापर केला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : ही मोहीम जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहेसर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सिकलसेल मुक्त चंद्रपूर जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी केले आहे.

००००००